बेळगाव : इंजीनियर व कॉम्प्युटर ऑपरेटरने बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच; एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले

बेळगाव : इंजीनियर व कॉम्प्युटर ऑपरेटरने बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच;
एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : निपाणी नगरपंचायतीचे कनिष्ठ अभियंता / इंजीनियर व कॉम्प्युटर ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले. सरकारी कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडे ६५ हजारांची लाच मागितली होती. कनिष्ठ इंजीनियर सुभाषचंद्र इराप्पा चौगला व ऑपरेटर सागर सूर्यकांत कांबळे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. निपाणी नगरपंचायतीची काही सरकारी कामे कंत्राटदार प्रभाकर हनुमंत गग्गरी (रा. हंदिगुंद, ता. रायबाग) यांना दिली होती. एकूण केलेल्या कामाच्या बिलापोटी 13.5 टक्के इतकी रक्कम लाच स्वरूपात इंजीनियर सुभाषचंद्र यांनी मागितली होती.
यामध्ये समेट होऊन 65 हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. तत्पूर्वी, कंत्राटदार गग्गरी यांनी ही माहिती बेळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी Anti Corruption Bureau ACB) दिली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. बुधवारी 65 हजारांची लाच घेताना हे दोघे रंगेहाथ सापडले. एसीबीचे उपअधीक्षक शरणाप्पा, बेळगावचे निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, धारवाडचे निरीक्षक भाऊसाहेब जाधव, निरीक्षक एम. जी. हिरेमठ व अन्य सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. अभियंता सुभाषचंद्र हे चार महिन्यांपूर्वीच निपाणी नगरपंचायतीत रुजू झाले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : इंजीनियर व कॉम्प्युटर ऑपरेटरने बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच; एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm