कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातसह उपविभागातील किनार पट्टीला पुराचा धोका

कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातसह उपविभागातील किनार पट्टीला पुराचा धोका

belgavkar.com | belgaum | belgavkar

पावसाचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा Live Satellite Map

पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे

देशभरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यातील विविध भागात पाणी साचले आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर वाढला असून सखळ भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान आता गुजरात, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकासह उपविभागातील किनार पट्टीला पुराचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत सेंन्ट्रल वॉटर कमिशन ऑफिशल फ्लड फॉरकास्ट यांनी माहिती दिली आहे. तसेच आयएमडी यांनी फ्लॅश फ्लड (Flash Flood) मार्गदर्शन सुद्धा जाहीर केले आहेत.

आयएमडी यांनी गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह सौराष्ट्र येथे पावसाचा जोर वाढलेला दिसून येणार असल्याचे म्हटले आहे. तर कच्छ येथे आज आणि उद्या अतिवृष्टी होणार आहे. त्याचसोबत ओडिशा, छत्तीसगढ, ईस्ट मध्य प्रदेश, गंगेटिक पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे ही अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसऱ्या  बाजूला  पावसाची संततधार सुरु असल्याने राजाराम तलावातील पाण्याची पातळी 39 फुट पर्यंत वाढली आहे. कोल्हापूर मधील पंचगंगा नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कर्नाटक किनारपट्टी येथे आज, 8 आणि 9 ऑगस्टला अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचसोबत साऊथ कर्नाटकासह विविध ठिकाणी आणि तमिळनाडू सुद्धा आज, उद्या, 8-9 ऑगस्टला पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे ही आयएमडी यांनी सांगितले आहे. Flood flood Goa Gujrat IMD Maharashtra
Monsoon 2020 Monsoon Updates 2020 कर्नाटक कोकण गुजरात गोवा पुर महाराष्ट्र मान्सून 2020 मान्सून अपडेट्स

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातसह उपविभागातील किनार पट्टीला पुराचा धोका
पावसाचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा Live Satellite Map

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm