श्रीराम मंदिर हे भारतीय संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल : पंतप्रधान | मोदींनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा दाखला, म्हणाले…

श्रीराम मंदिर हे भारतीय संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल : पंतप्रधान | मोदींनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा दाखला, म्हणाले…

belgavkar.com | belgaum | belgavkar

अयोद्धेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपुजन आणि शिलान्यास कार्यक्रम पार पडला. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र टृस्टच्या कार्यक्रमातून नरेंद्र मोदींनी जगभरातील राम भक्तांना संबोधित केले. यावेळेस श्रीरामाचा जप करत त्यांनी भाषणाला सुरूवात केली. आज या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणं हा अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोट्यावधी लोकांची प्रतिक्षा आता संपली आहे. 'राम सबमे है आणि राम सबके है' म्हणत त्यांनी एकात्मतेचा नारा दिला आहे. 
अयोध्या राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न; चांदीची वीट रचून मोदींनी केली रामजन्मभूमीची पायाभरणी.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांच्या पिढ्या चळवळीमध्ये गेल्या आहेत. त्याचाप्रमाणे राम जन्मभूमीसाठीदेखील अनेकांच्या पिढ्या झिजल्या आहेत. श्रीरामाचं मंदिर हे संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेलअसा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असेल. राम मंदिर हे आस्था, संकल्पाची प्रेरणा देणारं आहे. रामाने जसे 'मर्यादा' पाळल्या होत्या तशाच आजही व्यवहारामध्ये तशाच मर्यादा जोडल्या आहे. श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर निर्माण होत असल्याने संकटाच्या चक्रव्युहामधून पुन्हा श्रीरामाची सुटका झाली आहे. राम मंदिर म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही निर्मिती एक ऐतिहासिक घटना आहे. भारतासोबतच चीन, थायलंड, कंबोडिया मध्येही राम आढळतो असे सांगितले आहे. जम्मू कश्मिर पासून दक्षिण भारतामध्ये रामाची वेगवेगळी चरित्रं पूजली जातात.
या भूमिपूजन सोहळ्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्याचा उल्लेख केला. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी भारतामधील सर्व सामान्यांनी सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सर्वच देशवासियांचे कौतुक केलं. यावेळेस त्यांनी प्रभू रामचंद्रांना अगदी वानरांपासून खारीने मदत केली होती असा दाखलाही दिला. याचबरोबर मोदींनी काही ऐतिहासिक संदर्भ देत महान व्यक्तींना सामान्यांना केलेल्या सहकार्यमुळेच मोठे कार्य करता आले असं नमूद केलं. याचवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला.
'अयोध्येमधील राम मंदिराबरोबर नवीन इतिहास रचला जात आहे त्याचबरोबर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ज्याप्रमाणे खारीपासून वानरांपर्यंत आणि नावाड्यापासून ते वनामध्ये राहणाऱ्यांपर्यंत सर्वांना प्रभू रामचंद्राच्या विजयामध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य मिळालं. लहान लहान मुलांनी भगवान श्री कृष्णाला गोवर्धन पर्वत उचलल्याच्या परक्रमामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पडली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थपानेसाठी मावळ्यांनी सहकार्य केलं, महाराज सोहेलदेव यांना लढाईमध्ये गरिबांनी आणि मागासलेल्या लोकांनी मदत केली, दलित, मागास, आदिवासींबरोबरच सर्वच स्तरातील लोकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीजींनी सहकार्य केलं, त्याचप्रमाणे आज देशभरातील लोकांच्या सहकार्यामुळे राम मंदिराच्या उभारणीचे हे पवित्र काम सुरु झालं आहे,' असं मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले.
पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार – नरेंद्र मोदी
पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभारी मानले. राम मंदिराच्या टपाल तिकीटाचंही मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. आज प्रभू रामाचा जयघोष संपूर्ण जगभरात होत आहे असं सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींनी सियावर रामचंद्र की जय घोषणेने आपल्या भाषणाला सुरुवात केली.
…म्हणून आमंत्रण स्वीकारलं
शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेला आहे असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. मंदिराच्या भूमिपूजनाचा आमंत्रण का स्वीकारलं हे सांगताना पंतप्रधान मोदींकडून रामकार्य केल्याशिवाय मला आराम मिळत नाही अशी भावना व्यक्त केली. 'आज संपूर्ण भारत राममय झाला आहे. संपूर्ण देश रोमांचित आहे, प्रत्येकजण भावूक आहे. कित्येक दशकांची प्रतिक्षा आज संपत आहे. करोडो लोकांना आज आपण हा क्षण जिवंतपणी पाहू शकत आहोत यावर विश्वासच बसत नसेल,' असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं. संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली असंही ते भाषणामध्ये म्हणाले.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र टृस्टच्या कार्यक्रमामध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या. तसेच संत महंतांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये श्रीराम जन्मभूमी विशेष पोस्ट स्टॅम्प चं अनावरण करण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

श्रीराम मंदिर हे भारतीय संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल : पंतप्रधान | मोदींनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा दाखला, म्हणाले…

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm