अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात

अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात

belgavkar.com | belgaum | belgavkar

मोदींनी घेतलं रामलल्लाचं दर्शन, सुरू झाला भूमिपूजन सोहळा LIVE VIDEO

ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे. अयोध्येनगरीपासून ते राम मंदिराच्या भूमिपूजनापर्यंत जाणून घ्या LIVE अपडेट्स

नरेंद्र मोदी राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येत दाखल
अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी दुपारी 12.40 वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी करतील. या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे.
या द्वारेच संबंधित व्यक्तीला भूमिपूजनाच्या ठिकाणि प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये 135 संत-महंतांचा समावेश आहे. भूमीपूजनासाठी अयोध्येत सजावटीसोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेट्स लावले आहेत. चार पेक्षा जास्त लोकांना बंदी आहे. या निमित्ताने उत्तर प्रदेश राज्यात काही ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. दीपोत्सवासाठी  शरयू नदीचे घाट सुशोभित करण्यात आला आहेत.
मोदी हे हनुमानगढीवर पोहोचले. त्यांनी पुजाआरती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येत दाखल झालेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात
मोदींनी घेतलं रामलल्लाचं दर्शन, सुरू झाला भूमिपूजन सोहळा LIVE VIDEO

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm