लेबनानची राजधानी बेरूत मध्ये भीषण स्फोट ! अनेक लोक जखमी, काळजाची धडकी भरवणारा व्हिडीओ

लेबनानची राजधानी बेरूत मध्ये भीषण स्फोट ! अनेक लोक जखमी, काळजाची धडकी भरवणारा व्हिडीओ

belgavkar.com | belgaum | belgavkar

LIVE VIDEO झाला VIRAL

लेबननची राजधानी बैरुतमध्ये भीषण स्फोट झाला आहे. देशाच्या स्वास्थ मंत्र्यांनुसार लेबनानची राजधानी बेरुतमध्ये भयंकर स्फोट झाल्याने 75 जणांचा मृत्यू झाला आहे तर हजारो लोक जखमी झाले आहेत. मंगळवारी झालेल्या या जबरदस्त स्फोटामुळे अनेक भागात धक्का बसला आहे. स्फोटानंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट राजधानीच्या बंदराच्या भागात झाला, येथे अनेक गोदाम आहेत. सेंट्रल बैरूतमध्ये दोन मोठे स्फोट झाले. लेबननमध्ये असणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाने मदतीचे फोन क्रमांक दिले आहेत. या परिस्थितीत सगळ्यांनी शांत राहावं, असं आवाहनही करण्यात आहे.
स्फोटकांच्या कारखान्यात किंवा साठ्याजवळ हा स्फोट झाला असावा. दारूगोळा कारखान्यात हा भीषण अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या स्फोटामुळे शहराचा मोठा भाग हादरला. रस्त्याला भेगा पडल्या आणि आसपासच्या इमारतींनाही धक्का बसला.
स्फोट इतका शक्तीशाली होता की, शहराचा बहुतांश भाग हादरला. स्थानिक लोकांनी सांगितले की, स्फोटामुळे घरांच्या खिडक्यांच्या काचा तुटून पडल्या. लेबनानच्या मीडियाने स्फोटानंतर मलब्यात अडकलेल्या दोन लोकांची छायाचित्रे जारी केली आहेत, ज्यामध्ये काहीजण रक्ताने माखलेले दिसत आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. बेरूतच्या पोर्ट भागत झालेल्या या स्फोटाचा धक्का शहराच्या बहुतांश भागात जाणवला आणि काही ठिकाणी वीज सुद्धा गेली.
लेबनानच्या स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट बेरूत पोर्टवर झालेल्या एखाद्या घटनेमुळे झालेला असू शकतो. एका स्थानिक नागरिकाने ट्विट केले की, इमारती हलत आहेत. तर अन्य एका व्यक्तीने लिहिले की, एक जबरदस्त आणि कान बहिरे करणार्‍या स्फोटाने बेरूतला हादरवले आहे, अनेक मैलांवर हा आवाज ऐकू आला. लेबनानमधील वृत्तपत्रांच्या ऑनलाइन फुटेजमध्ये तुटलेल्या खिडक्या, अत्यावस्थ पडलेले फर्निचर आणि तुटलेले सिलिंग दिसत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

लेबनानची राजधानी बेरूत मध्ये भीषण स्फोट ! अनेक लोक जखमी, काळजाची धडकी भरवणारा व्हिडीओ
LIVE VIDEO झाला VIRAL

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm