बेळगाव : श्री राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळा भव्यदिव्य रीतीने साजरा होणार

बेळगाव : श्री राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळा भव्यदिव्य रीतीने साजरा होणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावच्या हिंदू संघटनांचा कसा असेल कार्यक्रम;

5 ऑगस्टला अयोध्येत  (Ayodhya)  होत असलेल्या श्री राम मंदिराच्या (Lord Ram Temple) भूमिपूजनाच्या कार्यक्रमाबाबत देशभर उत्साह संचारला आहे. देशातील करोडो हिंदू लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी बेळगावतही होत आहे. बेळगावात 5 ऑगस्टला राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळा भव्यदिव्य रीतीने साजरा होणार आहे. कोरोना साथीच्या काळात होत असलेल्या भूमिपूजनासाठी विशेष तयारी केली जात आहे. हा दिवस राम मंदिर आंदोलनाची समाप्ती करणाराही मानला जाईल. राम मंदिर आंदोलनासाठी कार्यरत असणारे अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत.

विश्व हिंदू परिषद बजरंग दल
- STM समर्थ नगर, तानाजी गल्ली, महाद्वार रोड बेळगाव
बुधवार 5 जुलै रोजी अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी भूमीपूजन निमित्ताने श्री रेणुका देवी मंदिर (छत्रपती शिवराय उड्डाण पूल) येथे महाआरती आयोजित केली आहे. तरी सर्व बजरंग दल कार्यकर्त्यांनी सायंकाळी ठीक 7 वाजता उपस्थित रहावे.
श्रीराम सेना हिंदूस्थान


श्रीराम सेना हिंदूस्थान बेळगाव
अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी भूमीपूजन निमित्ताने श्रीराम मंदिर (रामदेव गल्ली) येथे महाआरती आयोजित केली आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी ठीक 10 वाजता उपस्थित रहावे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान


अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा 5 ऑगस्ट 2020 रोजी होणार असून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्यातर्फे विविध ठिकाणी पूजा करण्यात येणार आहे. नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डोक्यावर पांढरी धारकरी टोपी किंवा भगवा फेटा परीधान करावा व शासनाने कोरोनासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शिवप्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गावात शिवमुर्तीसमोर नवीन भगवा ध्वज (त्यावर कोणतेही चित्र नसलेला) लावून विधीवत मुर्ती पुजन करून गोड प्रसाद वाटप करावा व आनंदोत्सव साजरा करावा. बेळगाव शहरात छत्रपती शिवाजी उद्यान, धर्मवीर संभाजी चौक, शिवतीर्थ याठिकाणी पहाटे पुजा करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात शिवमूर्तीसमोर कोणतेही चित्र नसलेला नवा भगवा लावून विधिवत मूर्तिपूजन करावे आणि गोड प्रसाद वाटप करावा, असे कळविले आहे. श्री राम मंदिराचे बांधकाम लवकर मार्गी लागावे, यासाठी प्रार्थनाही करण्यात येणार आहे.
प्रभु श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी उद्या सकाळी ठीक 6:00 वा. छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे शिवपूजन करण्यात येणार आहे.
त्यानंतर ठीक 7:00 वा. धर्मवीर श्री संभाजी महाराजांची पूजा करण्यास धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे जमायचे आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : श्री राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळा भव्यदिव्य रीतीने साजरा होणार
बेळगावच्या हिंदू संघटनांचा कसा असेल कार्यक्रम;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm