अयोध्या येथील राम मंदिराचे प्रस्तावित मॉडेल, पहा फोटोज PHOTOS

अयोध्या येथील राम मंदिराचे प्रस्तावित मॉडेल, पहा फोटोज PHOTOS

belgavkar.com | belgaum | belgavkar

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. हा दिवस राम मंदिर आंदोलनाची समाप्ती करणाराही मानला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होईल. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याची तयारी देशभर सुरू झाली आहे.

अयोध्या (Ayodhya) येथील राम मंदिराचे (Ram Mandir) भूमीपूजन उद्या बुधवार, 5 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने (Ram Janmbhoomi Teerth Kshetra) मंदिराच्या प्रस्तावित मॉडेलचे (Proposed Model) काही फोटोज ट्विटरवर शेअर केले आहेत. मंदिराचे हे मॉडेल म्हणजे भारतीय वास्तुस्थापत्य कलेचे अनोखे उदाहरण आहे.

कोरोना साथीच्या काळात होत असलेल्या भूमिपूजनासाठी विशेष तयारी केली जात आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी अगदी जोरात सुरू आहे. चांदीची वीट रचून मंदिराची पायाभरणी करण्यात येईल. 5 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अयोध्या येथील राम मंदिराचे प्रस्तावित मॉडेल, पहा फोटोज PHOTOS

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm