यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर, प्रदीप सिंह देशात अव्वल; परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड

यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर, प्रदीप सिंह देशात अव्वल;
परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव - जगदीश अडहळ्ळी-440, आनंद कडलगी-446, प्रफुल देसाई-532, गजानन बाळे-663, प्रियंका कांबळे-670

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2019चा (Civil Services Examination) निकाल परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. प्रदीप सिंह देशात अव्वल आला असून महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. तर जतिन किशोर दुसऱ्या क्रमांकावर असून प्रतिभा वर्मा तिसऱ्या आणि महिला उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
UPSC Civil Services Examination 2019 Result



एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यात 304 उमेदवार जनरल कॅटेगरी, 78 ईडब्लूएस, 251 ओबीसी, 129 एससी आणि 67 एसटी कॅटेगरीमधील आहेत. दरवर्षी आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याची स्वप्ने बाळगणारे लाखो उमेदवार सिव्हिल सेवा परीक्षा दतात. ही परीक्षा देशातील कठीण परीक्षांपैकी एक असते. यूपीएससीच्या सिव्हिल सेवा परीक्षेद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस, रेल्वे ग्रुप ए, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस, भारतीय डाक सेवा, इंडियन ट्रेड सर्व्हिसेस सहित इतर ठिकाणी निवड केली जाते. 

बेळगाव - जगदीश अडहळ्ळी-440, आनंद कडलगी-446, प्रफुल देसाई-532, गजानन बाळे-663 प्रियंका कांबळे-670

Jagdish Adahalli - Kagwad Taluka Mole Village Belgaum - 440 Rank


Anand Kaladagi - KLS GIT Alumnus Mr.
studied Mechanical Engineering 2014 to 2018 - 446 Rank


Praful Desai from Yaranal Hukkeri Taluka Belgaum - 532 Rank


Gajanan Bale from Raibag Taluka Kudach Belgaum - 663 Rank


Ms. Priyanka Kamble from Chikkodi * 670 Rank
तुम्ही असा पाहू शकता निकाल Union Public Service Commission - UPSC
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी upsc.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.
त्यानंतर Civil Services Examination, 2019 या सेक्शनवर क्लिक करा( या लिंकवर क्लिक करून निकाल चेक करा)
रिझल्ट पीडीएफ फॉरमॅटमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करा
या पीडीएफ फॉरमॅटमध्ये तुमच्या रोलनंबरने निकाल पाहू शकता
यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते, प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतून फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाते. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर, प्रदीप सिंह देशात अव्वल; परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड
बेळगाव - जगदीश अडहळ्ळी-440, आनंद कडलगी-446, प्रफुल देसाई-532, गजानन बाळे-663, प्रियंका कांबळे-670

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm