बेळगाव : खानापूर तालुक्यात 4 कोरोना पाॅझिटिव्ह - 'या' तालुक्यातील पोलीस स्टेशन सीलडाऊन

बेळगाव : खानापूर तालुक्यात 4 कोरोना पाॅझिटिव्ह - 'या' तालुक्यातील पोलीस स्टेशन सीलडाऊन

belgavkar.com | belgaum | belgavkar

महापालिका सफाई ठेकेदार व महिला कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू - 600 कोरोनाबधितांवर घरीच उपचार

बेळगाव : खानापूर तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी (4 जुलै) तालुक्यात आणखी चार कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 70 वर पोहचले आहे. खानापूर शहर आश्रय कॉलनी येथील 25 वर्षीय महिला तर शहरातील आणखी एका 51 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. नंदगड गावातील एक 57 वर्षीय पुरूष व कोचडवाड येथील एका 23 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बेळगाव महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगार महिलेचा रविवारी कोरोनामुळेच मृत्यू झाला होता. त्यानंतर आज मंगळवारी पहाटे बिम्स मध्ये महापालिकेच्या सफाई ठेकेदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे महापालिकेचा संपूर्ण आरोग्य विभागच धास्तावला आहे. तरुण ठेकेदार गेल्या काही दिवसांपासून आजारी होता.
त्याच्यावर घरीच एका खासगी डॉक्टरकडून उपचार सुरू होते. या ठेकेदारांने हॉस्पिटलमध्ये दाखल न होता घरीच उपचार करून घेण्याचा निर्णय घेतला. शहापूर येथील एका डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू होते, पण ठेकेदाराचा तो निर्णय चुकीचा ठरला. तीन दिवसांपूर्वी त्या ठेकेदाराची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्याला तातडीने शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तेथे दाखल करून घेतले नाही. बिम्स मध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्या ठेकेदाराला बिम्स मध्ये दाखल करण्यात आले. त्या ठेकेदाराचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह होता. गेले दोन दिवस बिम्स मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचार सुरू असतानाच त्याचा अतिदक्षता विभागात मृत्यू झाला.
कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या 600 कोरोनाबधितांवर घरीच उपचार
कोरोनाची लक्षणे नसलेल्या सुमारे 600 कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तींवर घरीच उपचाराची व्यवस्था केली जात आहे. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी सांगितले की, ज्यांच्या घरी वेगळी सुविधा निर्माण करण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे त्यांनाच ही सुविधा उपलब्ध आहे. मुन्याळ मंगळवारी बोलताना म्हणाले की, ज्यांना गंभीर कोरोनाची लक्षणे नाहीत अशा लोकांसाठी घरीच Quarantine ची व्यवस्था केली जात आहे. यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, असेही ते म्हणाले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : खानापूर तालुक्यात 4 कोरोना पाॅझिटिव्ह - 'या' तालुक्यातील पोलीस स्टेशन सीलडाऊन
महापालिका सफाई ठेकेदार व महिला कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू - 600 कोरोनाबधितांवर घरीच उपचार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm