बेळगाव : मुतगाजवळ टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बेळगाव : मुतगाजवळ टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : दुचाकीला भरधाव टँकरने समोरुन धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रक्षाबंधणाच्या दिवशी घडली आहे. बेळगाव - बागलकोट मार्गावर मुतगाजवळ झालेल्या अपघातात नागराज सोमप्पा दळवाई (वय 29, रा . मुरगोड ता. सौंदत्ती) युवक जागीच ठार झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, नागराज आपल्या दुचाकीवरुन (KA 24 S 3239) जात होता. तर टँकर (KA 22 D 0116) नेसरगीहून बेळगावकडे अतिवेगाने येत होता.
मुतगे गावानजीक टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीस्वार नागराज जागीच ठार झाला. नागराज हा रक्षाबंधनासाठी आपल्या बहिणीकडे गेला होता. अपघाताची माहिती मिळताच मारिहाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. घटनेची नोंद मारिहाळ पोलीस स्थानकात झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मुतगाजवळ टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm