बेळगाव : काकतीजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने महिला गंभीर जखमी

बेळगाव : काकतीजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने महिला गंभीर जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

ओळखीच्या व्यक्तींनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन

बेळगाव : पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काकतीजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. 31 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता ही घटना घडली असून सोमवारी यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काकती येथील क्लासिक वाईन शॉपजवळ ही घटना घडली आहे. बेळगावहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या ठोकरीने सुमारे 40 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे.
तिचे नाव पद्मावती असल्याचे समजते. मात्र तिचा संपूर्ण पत्ता समजला नाही. गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ती महिला हिंदी भाषेत बोलते. संबंधितांनी काकती पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपघातानंतर वाहन चालकाने आपल्या वाहनासह पलायन केले आहे. तरी संबधीतांनी तसेच ओळखीच्या व्यक्तींनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : काकतीजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने महिला गंभीर जखमी
ओळखीच्या व्यक्तींनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm