बेळगाव : काम करताना इमारतीवरून पडल्याने युवकाचा मृत्यू

बेळगाव : काम करताना इमारतीवरून पडल्याने युवकाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

प्लंबिंगचे काम करताना इमारतीवरून पडल्याने मुचंडीच्या (ता. बेळगाव) युवकाचा रविवारी सायंकाळी हलकर्णीत (ता. चंदगड) मृत्यू झाला आहे. आकाश नागो वरपे ( वय 24, रा. मूळ मुचंडी, सध्या सोनोली, ता. बेळगाव ) असे त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आकाश प्लंबिंग कामासाठी हलकर्णीला जात होता. इमारतीवर चढून काम करत असताना तोल जाऊन तो कोसळला. त्यात त्याच्या डोकीला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ बेळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली.
मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सोमवारी (3 जुलै) सकाळी 9 वाजता त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद चंदगड पोलीस स्थानकात झाली आहे. त्याचे आई - वडील लहाणपणी वारले असल्याने तो सोनोलीतील नातलगांच्या घरी राहत होता. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उचगावमध्ये झाले. पूर्वी तो शिनोळीतील कारखान्यात कामाला जात होता. मात्र, लॉकडाउनमुळे कारखाने बंद असल्याने सध्या प्लंबिंग जात होता. चंदगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : काम करताना इमारतीवरून पडल्याने युवकाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm