कोरोना - सलग तिसऱ्या दिवशी 24 तासांत 52 हजार नवीन रुग्ण, चिंता वाढवणारी आकडेवारी

कोरोना - सलग तिसऱ्या दिवशी 24 तासांत 52 हजार नवीन रुग्ण, चिंता वाढवणारी आकडेवारी

belgavkar.com | belgaum | belgavkar

'लशीमुळेही नष्ट होणार नाही कोरोना', WHO प्रमुखांचा धक्कादायक इशारा

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडले. गेल्या 24 तासांत 52 हजार 050 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 803 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 55 हजार 746 झाली आहे. यात 5 लाख 86 हजार 298 अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 12 लाख 30 हजारहून अधिक रुग्ण निरोगी झाले आहे.
इंडियन काउन्सिल ऑफ रिसर्च (ICMR) नुसार देशात आतापर्यंत 2 कोटी 8 लाख 64 हजार 750 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल 6 लाख 61 हजार 182 लोकांची चाचणी करण्यात आली. कोरोना संक्रमितांच्या संख्येत भारत, अमेरिका आणि ब्राझील जगातील तीन सर्व प्रभावित देश आहे. मात्र यात भारतातील परिस्थिती चांगली आहे. भारताचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. भारतापेक्षा अधिक प्रकरणं अमेरिका (4,862,174), ब्राझीलमध्ये (2,751,665) आहेत.
WHOने सोमवारी म्हटले आहे की, COVID-19 टाळण्यासाठी लस तयार करण्याची शर्यत तीव्र झाली असली तरीही कोरोनावर कोणताही 'रामबाण उपाय' कदाचित कधीच मिळू शकणार नाही. अद्याप कोरोनाची लस उपलब्ध नसली तरी, काही लशीच्या चाचणी या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र यातच जागितक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अॅडॅनॉम यांनी, अपेक्षा आहे की कोरोनाची लस (Covid-19 Vaccine) लवकरच मिळेल. मात्र सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही आहे आणि ते मिळेल असेही दिसत नाही आहे, असे सांगितले. WHOने सोमवारी म्हटले आहे की, COVID-19 टाळण्यासाठी लस तयार करण्याची शर्यत तीव्र झाली असली तरीही कोरोनावर कोणताही 'रामबाण उपाय' कदाचित कधीच मिळू शकणार नाही. WHOने असेही म्हटले आहे की भारतासारख्या देशात ट्रान्समिशनचे दर खूप जास्त आहेत आणि त्यांनी दीर्घ युद्धासाठी सज्ज असले पाहिजे.
WHOचे संचालक टेड्रोस यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की कोरोनावर कोणताही ठोस उपचार नाही आहे. बहुधा कधीच होणार नाही. त्यांनी असेही म्हटले आहे की परिस्थिती सामान्य होण्यास अधिक वेळ लागू शकेल. टेड्रोस यापूर्वी बर्‍याच वेळा म्हणाले आहे की कोरोना कधीही संपू शकत नाही आणि त्याबरोबर जगायला शिका. टेड्रोस म्हणाले की कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जगभरातील लोक सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आणि मास्क घालत आहेत आणि हे सुरू ठेवणे आवश्यक आहे. आतापर्यंत जगभरात एक कोटी 81 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
'लस मिऴाल्यानंतरही कोरोना संपेल, असे नाही'
टेड्रोस म्हणाले की, 'बर्‍याच लस ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. आशा आहे की एक लस लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी प्रभावी ठरेल. मात्र, यासाठी कोणतेही निश्चित औषध नाही आणि असेही शक्य आहे की ते कधीही सापडणार नाही. अशा परिस्थितीत, आपण टेस्ट, आयसोलेशन आणि मास्कद्वारे कोरोना थांबविण्याचे कार्य चालू ठेवूया. त्यांनी असेही म्हटले आहे की ज्या मातांना कोरोनाची लक्षण आहेत किंवा कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यांनी स्तनपान करणे थांबवू नये. टेड्रोस यांनी याआधी जूनच्या सुरुवातीलाही म्हटले होते की, 'आम्हाला माहित आहे की वृद्ध वय असलेल्यांपेक्षा मुलांमध्ये कोरोनाचा धोका कमी असतो, परंतु असे बरेच रोग आहेत जे मुलांना जास्त धोका देऊ शकतात आणि स्तनपानामुळे असे आजार रोखले जाऊ शकतात'. दुसरीकडे लवकरात लवकरत लस मिळेल अशी आशाही टेड्रोस यांनी यावेळी व्यक्त केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कोरोना - सलग तिसऱ्या दिवशी 24 तासांत 52 हजार नवीन रुग्ण, चिंता वाढवणारी आकडेवारी
'लशीमुळेही नष्ट होणार नाही कोरोना', WHO प्रमुखांचा धक्कादायक इशारा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm