स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी गाईडलाईन्स जारी : बेळगाव जिल्हाधिकारी

स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी गाईडलाईन्स जारी : बेळगाव जिल्हाधिकारी

belgavkar.com | belgaum | belgavkar

Coronavirus कोरोना वॉरीअर्संना या कार्यक्रमाचे आमंत्रण

बेळगाव : कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करण्यासंबंधित काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त लोकांनी एकत्रित येणे टाळा. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करावा असे या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. सर्व सरकारी कार्यालये यांच्यासाठी या सूचना जारी केल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावात स्वातंत्र्यदिन कसा साजरा करावा यासंदर्भात माहिती देण्यात आली. शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे. आज सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत पुढे बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, स्वातंत्र्यदिनी जिल्हा पालकमंत्री रमेश जाराकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यावेळी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मास्क घालावे, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर यावर्षी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. त्याचप्रमाणे कोणत्याही शाळा आणि महाविद्यालयाच्या संघांना पथसंचलनात भाग घेण्याची परवानगी मिळणार नाही. डॉक्टर, आशा कार्यकर्त्यां आणि कोरोना मुक्त झालेल्या 5 जणांना समारंभात आमंत्रित करून सन्मानित केले जाईल. कार्यक्रम दरम्यान थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर आणि चेकअपसाठी प्रवेशद्वारावर वैद्यकीय पथके तैनात करण्यात येतील. पथसंचलनात केवळ पोलिस, होमगार्ड, अग्निशमन दल, एनसीसी आणि स्काउट्स कॅडेट्स सहभागी होतील. यावेळी विद्यार्थ्यांच्या संघांना परेडमध्ये परवानगी नाही. या परेडमध्ये केवळ 12 प्लाटून सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले. प्लास्टिकच्या ध्वजाची विक्री आणि वापरण्यास मनाई आहे. प्लास्टिकचा झेंडा सापडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा हिरेमठ यांनी दिला.
कोविड-19 च्या संकट लक्षात घेता या कार्यक्रमात लोकांची गर्दी होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसंच मास्क घालणे, सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना वॉरीअर्संना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात यावे असे नियमावलीत म्हटले आहे. तसंच कोरोनामुक्त झालेल्या काही व्यक्तींनाही या कार्यक्रमात सहभागी करुन घेता येईल, असेही गाईडलाईन्समध्ये नमूद करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, अतिरीक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, पोलिस उपअधीक्षक अशोक नेली, मनपा आयुक्त जगदीश के. एच., जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशीकांत मुन्याळ व विविध मान्यवर, उपसमित्यांचे अध्यक्ष, सदस्य बैठकीत उपस्थित होते.
15 ऑगस्ट 15th August Coronavirus Pandemic guidelines Independence Day Celebrations Independence Day 2020 MHA कोरोना व्हायरस स्वातंत्र्य दिन 
स्वातंत्र्य दिन 2020 
स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी गाईडलाईन्स जारी : बेळगाव जिल्हाधिकारी
Coronavirus कोरोना वॉरीअर्संना या कार्यक्रमाचे आमंत्रण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm