बेळगाव : ढाब्यावर 27 हजारांचे मद्य जप्त; दोघांना अटक

बेळगाव : ढाब्यावर 27 हजारांचे मद्य जप्त;
दोघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बकरी ईदमुळे मद्यविक्री बंद असताना चोरून मद्य विकणाऱ्या ढाब्यावर गुन्हे विभागाने छापा टाकला. यामध्ये 27 हजाराचे मद्य जप्त केले. अतिवाड व बेक्कीनकेरे गावच्या हद्दीतील वृंदावन ढाब्याजवळ ही कारवाई केली. गुन्हे विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी व त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या प्रकरणी संभाजी भरमा पाटील (वय 21, रा. अतिवाड) व मुरलीधर बाबुराव जाधव (रा. चव्हाट गल्ली, बेळगाव ) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी ईदमुळे मद्यविक्री बंद होती. परंतु, अतिवाडजवळ मद्यविक्री सुरू असल्याची माहिती एसीपी जिद्दी यांना मिळाली.
त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन येथे छापा टाकला असता येथे टेट्रा पॅकसह विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. संभाजीने हा साठा चव्हाट गल्ली येथील मुरलीधर बाबुराव जाधव यांच्याकडून आणल्याची कबुली दिली असून मुरलीधर यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक अबकारी कायदा अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अतिवाडजवळ मोठ्या प्रमाणात बेकायदा दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला आहे. या घटनेची नोंद काकती पोलिसांत झाली आहे. एसीपी जिद्दी व काकतीचे निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर यांच्या नेतृत्वाखाली आय. एस. पाटील, ए. एल. पाटील, एस. बी. पाटील, एम. डी. पुजेरी, पी. बी. बल्लाळ यांनी ही कारवाई केली. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ढाब्यावर 27 हजारांचे मद्य जप्त; दोघांना अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm