बेळगाव : कधीही बंद नसणारे सब रजिस्ट्रार ऑफिस दुसऱ्यांदा झाले सीलडाऊन Coronavirus

बेळगाव : कधीही बंद नसणारे सब रजिस्ट्रार ऑफिस दुसऱ्यांदा झाले सीलडाऊन Coronavirus

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोरोना व्हायरस संकटात अनेक सरकारी कार्यालये बंद असली तरी सर्वात जास्त महसूल देणारे कार्यालय असणारे सब रजिस्ट्रार ऑफिस (उपनोंदणी कार्यालय) चालूच होते. लाॅकडाऊनमध्येही उपनोंदणी कार्यालय कधीच बंद करण्यात आले नाही. नेहमीच या ठिकाणी गर्दी दिसत होती. आता बेळगाव शहरातील सब- रजिस्ट्रार ऑफिस कार्यालयामध्ये दुसऱ्यांदा आज पुन्हा कोरोनाबाधित आढळले आहेत. कार्यालयातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने कार्यालय सीलडाऊन झाले आहे.
कोरोनाबाधितांमध्ये एक पुरुष आणि एक महिला कर्मचारी आहे. कडक लॉकडाऊनमध्येही बिनधिक्कत सुरू असलेले सब रजिस्ट्रार कार्यालय पंधरवड्यात दुसऱ्यांदा सीलडाऊन झाले. या घटनेनंतर तातडीने सोमवारी पूर्ण कामकाज बंद करण्यात आले. त्याचबरोबर कार्यालयाचे सॅनिटायझेशनही होणार आहे. या कार्यालयामध्ये जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करणारा एक एजंट आपल्या वकीलासोबत आला होता. संबंधित एजंट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे काही दिवसांपूर्वी तपासणीत आढळून आले होते.
उपनोंदणी कार्यालयामध्ये खरेदी-विक्री तसेच इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात दररोज गर्दी उसळते. त्या ठिकाणी अधिकार्यांनी सोशल डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न केला तरी गर्दीमुळे ते शक्य नाही. आता दुसर्यांदा कोरोनाची बाधा झाली असली तरी या कार्यालयातील आणखी किती जणांना तसेच इतर एजंटांना बाधा झाली आहे का? याचा तपास करणे गरजेचे आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कधीही बंद नसणारे सब रजिस्ट्रार ऑफिस दुसऱ्यांदा झाले सीलडाऊन Coronavirus

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm