बेळगाव तालुक्यातील महिलेचा घटप्रभा नदीपात्रात मृतदेह आढळून आला

बेळगाव तालुक्यातील महिलेचा घटप्रभा नदीपात्रात मृतदेह आढळून आला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव येथील एका महिलेचा घटप्रभा नदीपात्रात मृतदेह आढळून आला आहे. रविवारी काकती पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला तपासणीसाठी तो सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविला आहे. निर्मला परसू यमेटकर (वय 30, रा, मरणहोळ) असे त्या महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यासंबंधी रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस सूत्रांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसांपासून निर्मला बेपत्ता होती. तिचा शोध घेण्यात येत होता. निर्मलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा झाला नाही. शवचिकित्सा अहवालानंतर यासंबंधीची माहिती मिळणार आहे. निर्मला या 30 जुलै रोजी शेतात गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. घटप्रभा नदीच्या काठावर गवत कापत असताना त्या पाय घसरून पडल्या असाव्यात. त्या नदीत पडल्याचा संशय असल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता.
रविवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव तालुक्यातील महिलेचा घटप्रभा नदीपात्रात मृतदेह आढळून आला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm