सीपीआय संतोष सत्यनाईक कोरोना पाॅझिटिव्हच Coronavirus

सीपीआय संतोष सत्यनाईक कोरोना पाॅझिटिव्हच Coronavirus

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : रविवारी निपाणी शहरातील दोन पुरुष व एक महिला तर कोडणी येथील 60 वर्षीय इसम अशा एकूण 4 जणांना कोरोनाची लागण लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या 112 वर पोहोचली आहे. तसेच निपाणीचे सीपीआय संतोष सत्यनायक यांचा कोरोना तपासणीचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. गेले चार महिने निपाणी व परिसरातील नागरीकांचे कोरोना महामारीपासुन रक्षण करनारे लोकप्रीय, कर्तव्यदक्ष अधिकारी सीपीआय श्री संतोष सत्यनाईक साहेब यांचा कोरोना पाॅझिटिव्ह रिपोर्ट आला होता.
कर्नाटक व महाराष्र्ट सीमेवरील कोगनोळी नाक्यावर संपुर्ण जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र राबुन रक्षण करनार्या अधिकार्यास कोरोना झाल्याने सर्व निपाणी तालुकावासीय ईश्वर चरणी अशी प्रांर्थना करतो की सत्यनाईक साहेब लवकरात लवकर बरे होवोत. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी आम्ही सर्व तालुकावासीय त्यांना आशीर्वाद व खुप खुप शुभेच्छा देत आहोत.
दोन दिवसापूर्वी दुसऱ्यांदा माझी कोरोना चाचणी झाली आणि पुन्हा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र माझ्या कुटुंबातील तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, हे दिलासादायक आहे. निपाणी तालुक्यातील कोरोनाचा सामूहिक संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. - संतोष सत्यनायक सीपीआय, निपाणी

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

सीपीआय संतोष सत्यनाईक कोरोना पाॅझिटिव्हच Coronavirus

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm