बेळगावात गोहत्या प्रकरणामुळे खळबळ Viral Video नंतर गुन्हा दाखल

बेळगावात गोहत्या प्रकरणामुळे खळबळ Viral Video नंतर गुन्हा दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गोहत्या प्रकरणामुळे बेळगाव शहरात खळबळ माजली आहे. बकरी ईद दिवशी केलेल्या गोहत्येचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. शिवाजीनगर येथील पंजीबाबा परिसरात गोहत्येचा प्रकार घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली असून मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केट पोलिसांनी यासीन मुश्ताक मकानदार (रा. पंजीबाबा, शिवाजीनगर ) याच्यावर कर्नाटक गोहत्या बंदी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत. शनिवारी टिळकवाडी पोलिसांनीही ऑटोरिक्षातून गोमांस वाहतूक करणाऱ्या आनंदवाडी येथील एका रिक्षाचालकावर एफआयआर दाखल करून 25 किलो मांस जप्त केले होते. त्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी शिवाजीनगरातील पंजीबाबा परिसरात गोहत्येची ही घटना घडली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात गोहत्या प्रकरणामुळे खळबळ Viral Video नंतर गुन्हा दाखल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm