देशात कोरोना रुग्णांनी पार केला 18 लाखाचा टप्पा; पहा पुर्ण आकडेवारी

देशात कोरोना रुग्णांनी पार केला 18 लाखाचा टप्पा;
पहा पुर्ण आकडेवारी

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोरोनाच्या चाचण्यांनी सुद्धा 2 कोटींचा टप्पा पार केला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) माहितीनुसार देशात मागील 24 तासात कोरोनाचे 52,972 नवे रुग्ण आढळुन आले आहेत. यानुसार सद्य घडीला देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही 18 लाख 03 हजार आणि 696 वर पोहचली आहे. याशिवाय मागील 24 तासात एकुण 771 मृत्युंची नोंंद झाली असुन आजवर देशात कोरोनामुळे बळी गेलेल्यांंची संख्या 38,135 इतकी झाली आहे. सध्या देशात एकुण 5,79,357 कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असुन आजवर 1,186,203 जणांंनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. देशात सध्या कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट (Coronavirus Recovery Rate) 65.44% वर पोहचला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीची आणि मृतांची सरासरी पाहिल्यास 96.84% : 3.16% अशी टक्केवारी आहे.
दुसरीकडे आयसीएमआर च्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या चाचण्यांनी सुद्धा 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. आजवर, देशात एकुण 2,02,02,858 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असुन यातील 3,81,027 टेस्ट तर मागील 24 तासात पार पडल्या आहेत. दरम्यान, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) तर्फे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ला ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोविड-19च्या लसीची फेज 2 आणि 3 मधील मानवी क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Corona Alert Corona In India 
Coronavirus Cases In India 
Coronavirus Death Toll in India 
Coronavirus Pandemic 
Coronavirus positive cases in India 
Coronavirus Recovery Rate
Coronavirus updates 
COVID 19 recovery Rate 
COVID-19 India कोरोना रिकव्हरी रेट 
कोरोना रुग्ण कोरोना विषाणूबद्दल माहिती 
कोरोना व्हायरस 
कोरोना व्हायरस अपडेट्स 
कोरोना व्हायरस अलर्ट 
कोरोना व्हायरस भारत 
कोरोना व्हायरस मृत्यू 
कोरोना व्हायरस रुग्णसंख्या 
कोरोना व्हायरस रुग्णांचा रिकव्हरी रेट 
कोविड-19 भारत
कोरोना रुग्ण भारत कोरोना व्हायरस

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

देशात कोरोना रुग्णांनी पार केला 18 लाखाचा टप्पा; पहा पुर्ण आकडेवारी
कोरोनाच्या चाचण्यांनी सुद्धा 2 कोटींचा टप्पा पार केला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm