केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटीव्ह

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटीव्ह

belgavkar.com | belgaum | belgavkar

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी स्वतः ट्वीटरच्या माध्यमातून ही बातमी देताना त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असताना आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे.
Union Home Minister Amit Shah tests positive for #COVID19. He is being admitted to the hospital.
अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. अमित शाह यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत'.
'माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी,' असंही अमित शाह यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटीव्ह

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm