बेळगावमध्ये 5 ऑगस्ट रोजी आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन - विशेष पूजा

बेळगावमध्ये 5 ऑगस्ट रोजी आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन - विशेष पूजा

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाबाबत देशभर उत्साह संचारला

बेळगाव : 5 ऑगस्टला अयोध्येत  (Ayodhya)  होत असलेल्या श्री राम मंदिराच्या (Lord Ram Temple) भूमिपूजनाच्या कार्यक्रमाबाबत देशभर उत्साह संचारला आहे. राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा 5 ऑगस्ट 2020 रोजी होणार असून येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्यातर्फे विविध ठिकाणी पूजा करण्यात येणार आहे . नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्यापती प्रभू रामचंद्र जन्मस्थाना ठिकाणी असंख्य हिंदू धर्माभिमानी, कारसेवकांच्या बलीदानानंतर, कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर रामजन्मभूमीच्या त्याच ठिकाणी भव्य आणि दिव्य असे मंदिरं समस्त हिंदूंच्या सहकार्यातून बांधण्यात येणार आहे. त्या मंदिराचे भुमीपूजन शिलान्यास कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. डोक्यावर पांढरी धारकरी टोपी किंवा भगवा फेटा परीधान करावा व शासनाने कोरोनासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शिवप्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
त्या कार्यक्रमाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे 5 ऑगस्ट रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने या कार्यात बलीदान दिलेल्या त्या शूरवीरांची आठवण व मंदिर बांधकामाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे व छञपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची अपूरी इच्छा 'सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा, चुकुर होऊ नका' ही शपथ जागण्यासाठी प्रत्येक गावात शिवमुर्तीसमोर नवीन भगवा ध्वज (त्यावर कोणतेही चित्र नसलेला) लावून विधीवत मुर्ती पुजन करून गोड प्रसाद वाटप करावा व आनंदोत्सव साजरा करावा. बेळगाव शहरात छत्रपती शिवाजी उद्यान, धर्मवीर संभाजी चौक, शिवतीर्थ याठिकाणी पहाटे पुजा करण्यात येणार आहे.
प्रत्येक गावात शिवमूर्तीसमोर कोणतेही चित्र नसलेला नवा भगवा लावून विधिवत मूर्तिपूजन करावे आणि गोड प्रसाद वाटप करावा, असे कळविले आहे. श्री राम मंदिराचे बांधकाम लवकर मार्गी लागावे, यासाठी प्रार्थनाही करण्यात येणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावमध्ये 5 ऑगस्ट रोजी आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन - विशेष पूजा
श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाबाबत देशभर उत्साह संचारला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm