उत्तर प्रदेश कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण यांचे कोरोना व्हायरस ने निधन;

उत्तर प्रदेश कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण यांचे कोरोना व्हायरस ने निधन;

belgavkar.com | belgaum | belgavkar

योगी आदित्यनाथ यांचा आजचा अयोध्या दौरा रद्द

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण (Kamal Rani Varun) यांचे लखनऊ (Lucknow) मध्ये निधन झाले आहे. वरुण लखनऊ मधील रूग्णालयात कोरोनावर (Coronavirus)  उपचार घेत होत्या. मात्र 62 व्या वर्षी आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. 3 मे 1958 रोजी वरुण उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. त्या अकराव्या आणि बाराव्या लोकसभेच्या सदस्याही होत्या. सध्याच्या योगी आदित्यनाथ यांंच्या सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंंत्री होत्या. आज त्यांच्या मृत्यु नंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अयोध्या दौरा रद्द झाला आहे. राम जन्मभुमी मंदिर भुमी पुजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज योगी आदित्यनाथ अयोध्येला जाणार होते.
1989 ते 1995 या काळात त्या महानगर परिषद
1996 मध्ये त्या 11व्या लोकसभेच्या सदस्य
1996 ते 1997 पर्यंत त्यांनी कामगार व कल्याण समिती आणि उद्योग समितीच्या सदस्या
1997 मध्ये महिला सबलीकरणावर समितीच्या सदस्य
1998 मध्ये त्या दुसर्‍यांदा संंसदेत निवडुन आल्या
1998 ते 1999 दरम्यान अधिकृत भाषा समिती, कामगार व कल्याण समिती आणि पर्यटन मंत्रालयाच्या सल्लागार समितीसमवेत विविध समित्यांच्या सदस्य
कानपूर विद्यापीठात समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर
25 मे 1975 रोजी किशनलाल वरुणशी लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे.
मागील काही दिवसांपासुन त्या कोरोनाशी लढत होत्या आज अखेरीस त्यांची ही झुंंज अयशस्वी ठरली आहे.
 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

उत्तर प्रदेश कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण यांचे कोरोना व्हायरस ने निधन;
योगी आदित्यनाथ यांचा आजचा अयोध्या दौरा रद्द

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm