बेळगाव : भाजीमार्केटजवळ न्यू गांधीनगर येथील एकाचा मृतदेह आढळला

बेळगाव : भाजीमार्केटजवळ न्यू गांधीनगर येथील एकाचा मृतदेह आढळला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : भाजीमार्केटजवळ शनिवारी न्यू गांधीनगर येथील एकाचा मृतदेह आढळून आला आहे. शनिवारी मार्केट पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा झाला नाही. अरबाज अब्दुल शेख (वय 30, रा. न्यू गांधीनगर) असे त्याचे नाव आहे. एका दुकानासमोर हा युवक मृतावस्थेत आढळून आला आहे. घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
अरबाजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आला आहे. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा होणार आहे. अरबाज हा तृतीयपंथी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : भाजीमार्केटजवळ न्यू गांधीनगर येथील एकाचा मृतदेह आढळला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm