बेळगाव : रिक्षातून वाटप करण्यासाठी नेण्यात येत असलेले गोमांस जप्त; सहा गायी व एक बैल पोलिसांनी मुक्त केले

बेळगाव : रिक्षातून वाटप करण्यासाठी नेण्यात येत असलेले गोमांस जप्त;
सहा गायी व एक बैल पोलिसांनी मुक्त केले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : आनंदवाडी - शहापूर येथे ऑटोरिक्षातून गोमांसाची वाहतूक करताना एक रिक्षा अडवून मांस जप्त करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. KA 22 C 0856 क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून गोमांस वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सुमारे 25 किलो मांसासह ऑटोरिक्षा जप्त केली असून चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
विजय शेरीगार (रा. आनंदवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्फराज नामक रिक्षा चालकाविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत. ऑटोरिक्षातून वाटप करण्यासाठी नेताना ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सहा गायी, एक बैल मुक्त
मारिहाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा गायी व एक बैल पोलिसांनी मुक्त करून त्यांना गोशाळेत पाठवले. मारिहाळ शेतवडीत सहा गायी बांधल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी सायंकाळी शेतवडीत जाऊन त्यांनी एका गोठ्यात बांधलेल्या गायी पाहिल्या. त्याच्या मालकाची विचारणा केली असता कोणीही जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे या गायी गोशाळेत बांधण्यात आल्या. शनिवारी सकाळी पंतबाळेकुंद्री येथे एक बैल बांधला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तो देखील आणून गोशाळेत बांधला आहे. मालकी हक्क सांगणारे कोणीही पुढे न आल्याने एफआयआर झाला नसल्याचे निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांनी सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : रिक्षातून वाटप करण्यासाठी नेण्यात येत असलेले गोमांस जप्त; सहा गायी व एक बैल पोलिसांनी मुक्त केले

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm