huge-enthusiasm-in-market-for-raksha-bandhan-festival.jpg | रक्षाबंधनानिमित्त बेळगावातील बाजारपेठ रेशीमबंधांनी सजली  - रक्षाबंधन ला कोरोनाचे संकट | belgaum news | belgavkar बेळगावकर

रक्षाबंधनानिमित्त बेळगावातील बाजारपेठ रेशीमबंधांनी सजली - रक्षाबंधन ला कोरोनाचे संकट

belgavkar.com | belgaum | belgavkar

सर्वच समाजबांधवांमध्ये उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या श्रावणी पौर्णिमेच्या म्हणजेच रक्षाबंधनाच्या तयारीला वेग आला असून बाजारात वेगवेगळ्या प्रकारांतील आणि आकारांतील रंगीबेरंगी असंख्य राख्यांनी बाजारपेठ फुलली आहे.
रक्षाबंधन सणावर कोरोना विषाणुचे सावट
डिजिटल रक्षाबंधन साजरी करण्याकडे नागरिकांचा कल;
गणपत गल्ली, मारूती गल्ली, खडेबाझार, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली बाजारपेठेत दरवर्षी पेक्षा यंदा राखी चे प्रमाण खूप कमी आहे. पुर्वी रक्षाबंधनाच्या 15-20 बाजार पेठेत कार्टुन व नवीन राख्या उपल्ब्ध व्हायच्या. यांच्या खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात होती. तसेच भेटवस्तू व शोभेच्या वस्तू ची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात होती. मात्र यंदा मात्र ग्राहकां कडुन फार कमी खरेदी केली जात आहे. व्यापार्यांना कोव्हिड-19 महामारी चा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
रक्षाबंधन सणाला केवळ दोन दिवस (3 ऑगस्ट) उरले देखील बाजारात फारशा प्रमाणात राखी दिसत नाही. दरवर्षी जागोजागी असणाऱ्या स्टॉल आता गायब झाले आहेत. देशात रक्षाबंधन बहीण-भावाचा प्रवित्र सण मानला जातो. व दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.मात्र यंदा coronavirus महामारी चे सावट बहीण- भावांच्या प्रवित्र सणावर देखील आल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी निरनिराळ्या तऱ्हेच्या  राख्यांनी बाजारपेठ फुलून दिसायची यंदा मात्र बाजारपेठ ओस पडली दिसत आहे. सध्या मोजकेच राखी स्टॉल बाजारात दिसुन येत आहे. व त्या स्टॉल वर मोती- गोंडा असलेल्या साध्या राखी उपलब्ध आहेत. काही स्टॉल वर मागच्या वर्षी उरलेल्या राखी विक्री असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे बाजारात राखी स्टॉल वर गर्दी दिसून येत नाही. सध्या लॉकडाऊन व संचारबंदी मुळे बाहेर दुसऱ्या शहरात असलेल्या बहिणी भावाकडे जाऊन राखी बांधू शकत नाही. त्यामुळे पोस्टाने राखी पाठवली जात आहे. गोंडाची राखी वजनाने हलकी असल्याने बाकी राखी पेक्षा या राखी ची विक्री जास्त आहे.
देशावर असलेले संकट लक्षात घेऊन बहीण-भावाचा सण हा डिजिटल पध्दतीने करण्याचें ठरविले आहे. मात्र यात सगळ्यात बहिण भाऊ एकत्र येऊन रक्षाबंधन सण साजरा करता येणार नाही या बद्दल निराशा आहे. श्रावणातील पौर्णिमा मंगळवार 3 ऑगस्ट रोजी येत असून या दिवशी आपल्या भावाच्या हातात राखी बांधून बहिणी भावाचे औक्षणही करतात. केवळ हिंदू धर्मामध्येच नव्हेतर सर्वच धर्मीयांमध्ये मोठ्या उत्साहात होणारा हा सण साजरा केला जात आहे. भावाच्या हातात आकर्षक, सुंदर आणि हटके अशी राखी बांधण्यासाठी व त्याच्या खरेदीसाठी बाजारात बहिणींनी गर्दी करण्यास सुरुवातही केली आहे.