राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

belgavkar.com | belgaum | belgavkar

राज्यसभा खासदार - समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 64 व्या वर्षी सिंगापूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अमर सिंग हे समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस होते. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून त्यांना ओळखलं जायचं. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अमर सिंह यांच्या नावाची नेहमीच चर्चा असायची.
सिंगापूरच्या Mount Elizabeth Hospital मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमर सिंह यांचे शनिवारी दुपारी वयाच्या 64 व्या वर्षी निधन झालं. किडनीच्या आजारावर गेले काही वर्ष अमर सिंह उपचार घेत होते. जवळपास सहा महिन्यांपासून सिंगापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. 2013 मध्ये अमर सिंह यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. किडनीचा आजार झाल्यानंतर त्यांच्यावर दुबईत उपचार करण्यात आले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी पुन्हा राजकीय कामांना सुरुवात केली होती.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm