yellur-avarali-dam-girl-commit-suicide-belgaum-yellur-202008.jpg | बेळगाव : येळ्ळूरच्या धरणामध्ये युवतीची आत्महत्या...? | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : येळ्ळूरच्या धरणामध्ये युवतीची आत्महत्या...?

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : येळ्ळूर येथील अरवाळी धरणामध्ये एका युवतीने उडी घेऊन युवतीने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळावरील माहितीनुसार अरवाळी धरणाच्या ठिकाणी आज शनिवारी दुपारी एक युवती KA 22 HB 2904 या क्रमांकाच्या ॲक्टिवा दुचाकीवरून आली होती. त्यानंतर त्या युवतीने दुचाकी धरणाच्याकडेला लावली व काही क्षणातच तिने पाण्यात उडी घेतली असे प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले आहे.
यामुळे येळ्ळूर भागात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच येळ्ळूर गावच्या ग्रामस्थांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून धरणामध्ये मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. घटनेमुळे धरण परिसरात बघ्यांची देखील गर्दी वाढत आहे. आत्महत्या करणार्या युवतीबाबत माहिती व तिच्या आत्महत्येचे कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही. आरटीओ रजिस्टर माहितीनुसार ही दुचाकी संजय सुरेकर यांच्या मालकीची आहे.

सोनाली संजय सुरेकर (वय 19, रा. भाग्यनगर 9 वा क्राॅस, पारीजात काॅलनी) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
तिचा मोबाईल गाडीतच असल्साने सदर मोबाईलवरून तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर तिचे नातेवाईक तेथे आले व ही आमचीच दुचाकी असे म्हणून आक्रोश करायला लागले. मृतदेह धरणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

5.15 वाजता युवतीचा मृृतदेह पाण्याबाहेर अग्निशामक दल व पोलीसांनी काढला आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृृृृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.