भारतीय लष्कराच्या थीमशी संबंधित सर्व चित्रपट, डॉक्युमेंटरी किंवा वेब सीरीजवर संरक्षण मंत्रालयाची ‘या’साठी करडी नजर

भारतीय लष्कराच्या थीमशी संबंधित सर्व चित्रपट, डॉक्युमेंटरी किंवा वेब सीरीजवर संरक्षण मंत्रालयाची ‘या’साठी करडी नजर

belgavkar.com | belgaum | belgavkar

चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये हिंदुस्थानी लष्करी अधिकार्‍यांबाबत आक्षेपार्हरीत्या सादरीकरण केले जात असल्याची गंभीर दखल केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतली आहे. चित्रपट, वेब सीरिज आणि माहितीपट सुरक्षा दलांवर आधारित असतील तर त्यासाठी आधी संरक्षण मंत्रालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागेल, असे संरक्षण मंत्रालयाने सेंसॉर बोर्ड आणि माहिती प्रसारण मंत्रालयाला कळवले आहे. त्यामुळे चिञपट आणि वेब सीरिजमध्ये भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांची छवी आता चुकीच्या पद्धतीने दाखवले जाण्यावर अंकुश येणार आहे. चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये सैन्यदलांच्या अधिकाऱ्यांचे व्यक्तीमत्व आक्षेपार्ह पद्धतीने दाखवले जाते, अशा अनेक तक्रारी संरक्षण मंत्रालयाला प्राप्त झाल्या आहेत.
चित्रपट, डॉक्युमेंटरी किंवा वेब सीरिजमध्ये जर सशस्त्र सैनिकांना किंवा अधिकाऱ्यांना कोणत्याही स्वरुपात दाखवायचे असल्यास त्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल, अशा सूचना संरक्षण मंत्रालयाने सेंसर बोर्डाला (central board of film certification) केल्या आहेत.
सशस्त्र दलांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्याबाबत अनेक तक्रारी
सध्याच्या काही दिवसांमध्ये चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये भारतीय सैन्यदलांचे अधिकारी आणि जवानांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. वेब सीरिजमध्ये तर सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे आणि याबरोबरच लष्करी गणवेशाचा देखील मान राखला जात नसल्याच्या तक्रारी संरक्षण मंत्रालयाकडे आल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.
काही प्रकरणांमध्ये माजी सैनिकांनीह दाखल केले FIR
संरक्षण मंत्रालयाकडे ज्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, त्यांमध्ये कोड-एम, एक्स एक्स एक्स अनसेंसर्ड (सीझन-2) यांचा देखील समावेश आहे. या सीरिजमध्ये ज्या पद्धतीने लष्कराबाबत चित्रण करण्यात आले आहे, ते सत्यापासून कोसो दूर आहे आणि मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे, असे या तक्रारींमध्ये म्हटले गेले आहे. काही माजी सैनिकांनी तर या प्रकरणी एफआयआर देखील दाखल केले आहेत. या प्रकरणी त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि निर्मात्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे.
… तर मग संरक्षण मंत्रालयाची घ्यावी लागेल परवानगी
भारतीय लष्कराच्या थीमशी संबंधित सर्व चित्रपट, डॉक्युमेंटरी किंवा वेब सीरीज दाखवण्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे अशा सूचना प्रोडक्शन हाउसना द्यावेत, असे संरक्षण मंत्रालयाने औपचारिकपणे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला, तसेच सेंसर बोर्डाला लिहिले आहे. आपल्या ज्या चित्रिकरणामुळे सैन्यदलाची चुकीची प्रतिमा रंगवली जाते आणि सैनिकांच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे कोणतेही चित्रण करू नये, असा सूचना देण्यासही संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

भारतीय लष्कराच्या थीमशी संबंधित सर्व चित्रपट, डॉक्युमेंटरी किंवा वेब सीरीजवर संरक्षण मंत्रालयाची ‘या’साठी करडी नजर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm