बेळगाव : ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याला जिवे मारण्याचा प्रयत्न

बेळगाव : ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याला जिवे मारण्याचा प्रयत्न

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य असलेल्या पत्नीला अंगावर गाडी घालून पतीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार वडगाव पोलिसांत केली आहे. परशराम विठ्ठल रावत (वय 35, रा. पिरनवाडी) याच्याविरोधात खुनी हल्ल्याच्या प्रयत्नाचा एफआयआर झाला आहे. त्याची पत्नी नम्रता परशराम रावत (वय 30, रा. पिरनवाडी) यांनी याबाबतची फिर्याद दिली असून, त्या पिरनवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य आहेत. नम्रता रावत यांचे नऊ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. यानंतर त्या ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर पती नेहमी चारित्र्याचा संशय घेत असे. यातूनच हे दोघे आता वेगळे राहात असून, त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
गुरूवारी सकाळी 11.30 च्या सुमारास कामानिमित्त बाहेर जाऊन घराकडे परतताना पती परशराम हा त्याच्या टमटममधून पाठीमागून येत होता. आपण पुढे चालल्याचे पाहून त्याने पाठीमागून आपल्या अंगावर वाहन घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यामध्ये महिला जखमीअसून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याला जिवे मारण्याचा प्रयत्न

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm