belgaum-youth-death-snake-beaten-snake-catcher-sagar-muchandi-202008.jpg | बेळगाव : सर्पदंश झालेल्या सर्पमित्र युवकाचा उपचारांविना मृत्यू | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : सर्पदंश झालेल्या सर्पमित्र युवकाचा उपचारांविना मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सर्पदंश झालेल्या युवकाला उपचारांसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यासच नकार देण्यात आल्याने त्याचा उपचारांविना मृत्यू झाला. सागर मुचंडी (वय 20 रा. देवराज अर्स कॉलनी, बसवण कुडची ) असे त्या तरुणाचे नाव आहे. सागर सर्पमित्र होता. तो घरात किंवा कामाच्या ठिकाणी आढळणारे साप पकडून लोकांना मदत करत होता. गुरुवारीही त्याने साप पकडला होता. तो त्याने शेतात सोडून दिला होता. या दरम्यान त्याला सर्पदंश झाला होता. मात्र, ते त्याच्या लक्षात आले नाही.
गुरुवारी रात्री उशिरा तो अत्यवस्थ झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सागरला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. त्याला खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्याला सागर खासगी रुग्णालयात नेण्यात आलेही; पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे उपचारांचा उपयोग होणार नाही, असे रुग्णालयाने सागरच्या घरच्यांना सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला घरात नेले. उपचारांविना सर्पमिञाचा झाला.