भारतात कोरोनाचा हाहाकार! मागील 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक नवे रुग्ण Coronavirus

भारतात कोरोनाचा हाहाकार! मागील 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक नवे रुग्ण Coronavirus

belgavkar.com | belgaum | belgavkar

'या' वयोगटामधील मुलांकडून कोरोना संसर्गाचा धोका अधिक;
शिंकेतून कोरोनाचा प्रसार अधिक

भारताभोवती कोविड-19 (COVID-19) चा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला असून दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे. भारत केंद्र सरकार आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, देशात मागील 24 तासात 57,117 नवे रुग्ण आढळले असून 765 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 16 लाख 95 हजार 988 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 36,511 वर पोहोचला आहे. सद्य घडीला भारतात 5,65,103 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. भारतात काल दिवसभरात 36,568 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 10,94,374 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून येथील रुग्णांचा एकूण आकडा 4 लाख 22 हजार 118 वर पोहोचला आहे. 
एका रिसर्चमध्ये आता 5 वर्षांखालील मुलांकडून कोरोना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञांनी केलेल्या या रिसर्चनूसार, लहान मुलांमध्ये त्यांच्या श्वसनमार्गाच्या वरच्या भागात प्रौढांपेक्षा व्हायरल लोड 10 पट ते 100 पट जास्त आहे. कोरोना असणार्‍या मोठ्या मुलांमध्ये व्हायरल लोड प्रौढांमधील पातळीप्रमाणेच आहे. या अभ्यासामध्ये व्हायरल न्यूक्लिक अॅसिडचे प्रमाण 5 वर्षांखालील मुलांमध्ये जास्त असल्याचे दिसून आले. या अभ्यासामध्ये केवळ व्हायरल न्यूक्लिक अॅसिडचा अभ्यास करण्यात आला. संसर्गजन्य व्हायरसचा नाही, म्हणजेच ही मुलं व्हायरसचा प्रसार करतात की नाही हे अद्याप स्पष्ट नाही आहे. मात्र 5 वर्षांखालील मुलांकडून कोरोना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
लहान मुलांच्या शिंकेतून कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने
होत असल्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. अमेरिकेतील शिकागोच्या 'एन अँड रॉबर्ट एच. लुरी बालरूग्णालयातील पाच वर्षाखालील मुलांवर केलेल्या अध्ययनातून ही बाब समोर आली आहे. जास्त वयाच्या मुलांच्या तुलनेत या मुलांच्या नाकात द्रव पदार्थ अधिक असतो. तसेच विषाणूंसाठी आवश्‍यक जनुकांची संख्याही जास्त असल्याने हा प्रसार वेगाने होत असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी म्हटले आहे. 'जेएएमए पिडीयाट्रिक्‍स'या शोधपत्रिकेत नुकतेच हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
कसे झाले संशोधन :
- सौम्य लक्षणे दिसणाऱ्या 145 मुलांची निवड
- वय वर्ष पाचपर्यंत, 5 ते 17, 18 ते 65 अशा वयोगटांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला
- प्रत्येकाच्या नाकातील विषाणू प्रसाराची क्षमता (व्हायरल लोड) तपासण्यात आली
निष्कर्ष व मर्यादा :
- पाच वर्षापर्यंतच्या मुलांमधून कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची शक्‍यता
- मुलांच्या नाकातील द्रव पदार्थात जनुकांची संख्या अधिक
- शाळा आणि डे केअर सेंटर सुरू करताना योग्य काळजी घेणे आवश्‍यक
- प्राथमिक संशोधनातून ही शक्‍यता वर्तविण्यात आली आहे
पाच वर्ष वयापर्यंतच्या मुलांमध्ये श्‍वसनाशी निगडित आजारांचे जलद गतीने प्रसार होतो. कोविडचा प्रसार पाहता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने लहान मुलांचे एकत्रिकरण करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. आमचे संशोधन अशा प्रसाराची शक्‍यता दर्शवत आहे.
- डॉ. टेलर हेल्ड-सार्जंट, संसर्गजन्य आजारातील बालरोगतज्ज्ञ, शिकागो, अमेरिका.
Coronavirus: चिंताजनक! कोरोना बळींच्या संख्येत भारत पाचव्या स्थानी; इटलीलाही टाकले मागे. भारताने सर्वाधिक मृत्यु झालेल्या देशांच्या यादीत इटलीला मागे टाकत पाचवे स्थान गाठले आहे. यामुळे संपूर्ण देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
 
Corona Alert - Corona In India
Coronavirus Death Toll in India
Coronavirus Pandemic 
Coronavirus positive cases in India 
Coronavirus updates COVID-19 कोरोना विषाणूबद्दल माहिती 
कोरोना व्हायरस अपडेट्स 
कोरोना व्हायरस अलर्ट भारत 
कोरोना व्हायरस मृत्यू 
कोरोना व्हायरस रुग्णसंख्या 
कोविड-19 भारत कोरोना व्हायरस

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

भारतात कोरोनाचा हाहाकार! मागील 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक नवे रुग्ण Coronavirus
'या' वयोगटामधील मुलांकडून कोरोना संसर्गाचा धोका अधिक; शिंकेतून कोरोनाचा प्रसार अधिक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm