belgaum-sachin-basarikatti-death-mensi-galli-202008.jpg | सामाजिक कार्यकर्ते व शिवभक्त सचिन बसरीकट्टी यांचे निधन | belgaum news | belgavkar बेळगावकर

सामाजिक कार्यकर्ते व शिवभक्त सचिन बसरीकट्टी यांचे निधन

belgavkar.com | belgaum | belgavkar

भावपूर्ण श्रद्धांजली

बेळगाव : मेणशी गल्ली गणेशोत्सव व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यात योगदान देणारे तसेच शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सचिन बसरीकट्टी यांचे शनिवारी पहाटे हृदय विकाराने निधन झाले. सचिन बसरीकट्टी हे भाजपाचे जनरल सेक्रेटरीही होते. गेली 20 वर्ष त्यांनी बेळगावच्या शिवजयंती चिञरथ मिरवणूकीमध्ये छञपती शिवरायांची भूमिका केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, असा परिवार आहे.
सचिन बसरीकट्टी या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याने विविध क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणेही आढळली आहेत. याबाबत अधिकृृत माहिती प्रसिद्ध झालेली नाही. निधनाने गल्ली संपूर्ण बंद झाली आहे. सर्व व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवलेली आहेत.
कोरोना विषाणूची महामारी पडली महागात, गेला सामाजिक कार्यकर्त्याचा हकनाक बळी.?
सचिनचा कोरोनाने मृत्यू झाल्याची शक्यता आहे. गेल्या दहा दिवसांपासून सचिनला ञास होत होता. सामाजिक कार्य व अनेकांच्या संपर्कात येत असल्याने त्याला कोरोनाची लागण कशी झाली याचे एक गुढच आहे.? त्यामुळे त्यालाही कोरोनाची लागण झाली असावी. गेल्या काही दिवसांपासून तो घरातच होता. त्याला हळूवार ञास होत होता. परंतु, अंगावरच काढल्याने त्याचा ञास अधिकच झाला.
काल शुक्रवारी मध्यराञी अधिक ञास झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. माञ उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्वत:ला कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता असल्याने उपचाराविना घरी होता. माञ स्वःच्या घरच्यांनाही ञासात ठेवल्यासारखे आता झाले आहे. कोरोनामुळे हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे एका सामाजिक कार्यकर्त्याला.