बेळगाव : गायींच्या विनापरवाना वाहतूकप्रकरणी तिघांना ताब्यात

बेळगाव : गायींच्या विनापरवाना वाहतूकप्रकरणी तिघांना ताब्यात

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. हुक्केरी : गायींच्या विनापरवाना वाहतूकप्रकरणी महाराष्ट्रातील तिघांना ताब्यात घेतले. सकाळी 9.30 वाजता बेल्लद बागेवाडी क्रॉसजवळ हुक्केरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दादासो उत्तम कांबळे, शंकर नामदेव लोंढे व संदीप लाडासो कांबळे सर्व रा. सावर्डे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आले आहे.
मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून (एमएच 09 इएम 8843) 4 जर्सी गाई विनापरवाना, बेकायदा कसाई खान्याकडे नेत होते. बेल्लद बागेवाडी क्रॉसजवळ पोलिस उपनिरीक्षक शिवानंद गुडगनट्टी यांनी वाहन अडवून चौकशी केली असता आत गाई आढळल्या. एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या गायींबाबत तिघांकडे कागदपत्रे नसल्याने त्यांना ताब्यात घेतले. हुक्केरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : गायींच्या विनापरवाना वाहतूकप्रकरणी तिघांना ताब्यात

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm