बेळगाव : बिल्डिंगचे काम करत असताना विजेचा धक्का बसल्याने ठार

बेळगाव : बिल्डिंगचे काम करत असताना विजेचा धक्का बसल्याने ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बिल्डिंगचे काम करत असताना विजेचा धक्का बसल्याने तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. टीचर्स कॉलनी खासबाग येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडली. रुपेश उर्फ रत्नाकर खंडोलकर (वय 34, रा. मंगळवार पेठ, टिळकवाडी) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल कल्याणशेट्टी यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. तेथे रुपेश बिल्डिंग कामासाठी गेले होते. दुपारी 12.30 च्या सुमारास विजेचा धक्का बसल्याने रुपेशला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुपेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बिल्डिंगचे काम करत असताना विजेचा धक्का बसल्याने ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm