बेळगाव : गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव-अथणी : गुटखा विक्री करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीस अथणी पोलिसांनी अटक केली. शहानूर रमजान (भिरडी-सौंदत्ती), मेहबूब पठाण (जमखंडी) अशी त्यांची नावे आहेत. अब्याळ रस्त्याजवळ गुटखा विक्री होत असल्याचा सुगावा अथणी पोलिसांना मिळतात छापा टाकून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 33 हजार 600 रुपयांचा माल जप्त केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी, जमखंडी तालुक्यातून गुटखा, मावा रबकवी, बनहट्टी मार्गावरून दररोज शहराला पुरवठा करत होते. अथणी शहराबाहेर शहानुर रमजान (भिरडी-सौंदत्ती), मेहबूब पठाण (जमखंडी) हे गुटखा सुपारी माव्याचे साहित्य विक्री करताना निदर्शनास येताच पोलिसांनी छापा टाकून त्यांना अटक केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याबाबत अथणी पोलिसात गुन्हा नोंद आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm