बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर अपघातात युवक जागीच ठार

बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर अपघातात युवक जागीच ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सुतगट्टी घाटातील श्रीराम ढाब्याजवळ ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीस्वार जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्याला जोराची धडक दिली. त्यात तो रस्त्यावर कोसळल्याने डोक्याला दुखापत होऊन जागीच ठार झाला. सिद्राय नायक (वय 25, रा. काकती) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळूर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. धडक दिलेल्या वाहनाचा शोध सुरू आहे. काही खाजगी कामानिमित्त बाहेर गेला होता. गावी परतताना एका मोठ्या वाहनाने ठोकरल्याने हा अपघात घडला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. तीन महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. याप्रकरणी काकती पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर अपघातात युवक जागीच ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm