नवरदेवाच्या गळ्यात पैशांच्या नोटांचा हार घालणं पडलं महागात, स्कुटीवरुन आलेल्या दोघांनी सर्वांसमोर…

नवरदेवाच्या गळ्यात पैशांच्या नोटांचा हार घालणं पडलं महागात, स्कुटीवरुन आलेल्या दोघांनी सर्वांसमोर…

belgavkar.com | belgaum | belgavkar

इथून पुढे नवरदेवाच्या गळ्यात पैशांची माळ घालताना लोक घाबरतील यात शंका नाही

सध्या एका नवरदेवासोबत अशी घटना घडली आहे, ती पाहून इथून पुढे कोणीही लग्नात नवरदेवाच्या गळ्यात पैशांच्या माळ घालताना घाबरतील यात शंका नाही. हो कारण एका नवरदेवाने लग्न समारंभादरम्यान गळ्यात नोटांचा हार घातला होते. तो हार चोरट्यांनी सर्वांसमोर पळवल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जवळपास या नवरदेवाच्या गळ्यातील हार तब्बल 2 लाख रुपयांचा होता. त्यामुळे या नवरदेवाला ऐन लग्नात दोन लाखांचा भुर्दंड लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गळ्यातील पैशांचा हार पळवलेल्या नवरदेवाचे नाव रिझवान खान असून ही घटना गुरुवारी रात्री पश्चिम दिल्लीतील मायापुरी येथील एका बँक्वेट हॉलच्या बाहेर घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, नवऱ्याची घोड्यावरुन मिरवणूक सुरु असतानाच दोन चोरट्यांनी हार पळवला. दोन चोरट्यांनी ₹₹₹ रुपयांच्या जवळपास 329 नोटा पळवल्या आहेत. शिवाय त्यातील काही नोटा रस्त्यावरही पडल्या होत्या. नवरदेवाच्या गळ्यातील पैशांचा हार त्याचा मेहुणा, सरफराज खानने भेट दिला होता. संशयित चोरट्यांचा काही लोकांनी पाठलाग केला परंतू ते सापडले नाहीत.
पोलिसांच्या माहितीनुसार, लग्नाची मिरवणूक सुरु असतानाच स्कूटीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी नवरदेवाच्या गळ्यातील पैशांच्या नोटा पळवल्या. त्यानंतर दिल्लीतील जगतपुरी पोलिस ठाण्यात हा या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करताना अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता संशयिताची ओळख पटली. ज्या बँक्वेट हॉलमध्ये ही चोरी झाली होती त्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरी नगर परिसरातून चोरट्यांना पकडण्यात आले असून त्याच्या घरातून सुमारे 79 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत,” असेही पोलिसांनी सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

नवरदेवाच्या गळ्यात पैशांच्या नोटांचा हार घालणं पडलं महागात, स्कुटीवरुन आलेल्या दोघांनी सर्वांसमोर…
इथून पुढे नवरदेवाच्या गळ्यात पैशांची माळ घालताना लोक घाबरतील यात शंका नाही

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm