बेळगाव : मुचंडी - मुतगा रोडवर  अपघातात युवक ठार

बेळगाव : मुचंडी - मुतगा रोडवर अपघातात युवक ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास मुचंडी - मुतगा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. महेश महादेव अवाने (वय 27, रा. मुचंडी ) असे मृत युवकाचे नाव आहे. महेश हा मुचंडीहुन रात्री मुतगा येथे कामासाठी निघाला होता. समोरून निघालेल्या दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याची शक्यता आहे.
या अपघातामध्ये महेश गंभीर जखमी झाला. त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मारिहाळ पोलिस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक विजकुमार सिन्नूर पुढील तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मुचंडी - मुतगा रोडवर अपघातात युवक ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm