बेळगाव :  मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांना न्यायालयाची नोटीस

बेळगाव : मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांना न्यायालयाची नोटीस

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : 2019 मधील गोकाक विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार रमेश जारकीहोळी यांच्या प्रचारसभेत विरशैव लिंगायत समाजाला मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा मतदानाचे आवाहन केले होते. त्यामुळे निवडणुक अचारसंहिता भंग प्रकरणी न्यायालयाने मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाची पुढील सुनावणी 1 सप्टेंबर रोजी निश्‍चित करण्यात आली आहे. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे.
23 नोव्हेंबर 2019 रोजी गोकाकमधील प्रचारसभेत त्यांनी भाजपला मतदान करावे, असे आवाहन केले होते. गोकाक मतदार संघात लिंगायत समुदायाची संख्या अधिक असल्याने एका समुदायाला आकर्षित केल्यामुळे निवडणुक अचारसंहितेचा भंग झाला होता. याप्रकरणी गोकाक शहर पोलिस स्थानकात अचारसंहिता भंग प्रकरणी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाची सुणावणी जेएमएफसी प्रधान न्यायाधीशांसमोर सुरू आहे.
पोलिसांनी दाखल केलेला बी -रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला असून मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाची पुढील सुनावणी 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांना न्यायालयाची नोटीस

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm