श्रीरामाच्या मूर्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या शाळिग्रामचे महत्त्व माहिती आहे का?

श्रीरामाच्या मूर्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या शाळिग्रामचे महत्त्व माहिती आहे का?

belgavkar.com | belgaum | belgavkar

...आता तयारी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची;
दोन मोठ्या शाळीग्राम शिळा अयोध्येत पोहोचल्या

अयोध्येच्या श्रीराम मंदिरातली मुख्य मूर्ती कशी असेल, याबद्दल सर्वांमध्ये उत्सुकता आहे.

अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारण्याचं काम खूपच वेगाने चाललं आहे. 2024च्या जानेवारीपर्यंत श्रीराम मंदिराच्या तळमजल्याचं काम पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकंदरीतच कामाला वेग आला असून, नागरिकांमध्येही उत्साह दिसत आहे. या मंदिरातली रामाची मूर्ती कशी असेल, याबद्दलही सर्वांमध्ये उत्सुकता आहे. या भव्य मंदिरातली रामाची मूर्ती शाळिग्राम शिळेपासून तयार केली जाणार आहे. त्यासाठीची शाळिग्राम शिळा नेपाळमधल्या गंडकी नदीतून आणली जात आहे. या शिळेचे दोन तुकडे असून, या दोन्ही तुकड्यांचं एकत्रित वजन 127 क्विंटल आहे. हे दोन शिलाखंड 2 फेब्रुवारी 2023 पर्यंत अयोध्येत आणले जाणार आहेत.
सध्या हे शिलाखंड नेपाळमधल्या जनकपूरमध्ये आणण्यात आले आहेत. तिथल्या मुख्य मंदिरात पूजा-अर्चेनंतर या शिलाखंडांच्या पूजेचीही सुरुवात करण्यात आली आहे. या विशेष पूजेनंतर हे शिलाखंड भारतात आणले जातील. शाळिग्राम शिळेत भगवान विष्णूंचं अस्तित्व असतं, असं शास्त्र सांगतं. तुळशीमाता आणि भगवान शाळिग्राम यांचा उल्लेखही पौराणिक ग्रंथात आढळतो. शाळिग्रामाचा संबंध भगवान विष्णूंशी असल्याने या शिळाखंडांना मोठं धार्मिक महत्त्व आहे. या शिळांचं वैशिष्ट्य म्हणजे ते प्रामुख्याने गंडकी नदीतच सापडतात. हिमालयाच्या परिसरात पाणी आदळून या शिळांचे छोटे तुकडे होतात. नेपाळमध्ये अनेक जण हे दगड शोधून काढतात आणि त्यांची पूजा करतात.
शाळिग्राम 33 प्रकारचे असतात, असं म्हटलं जातं. शाळिग्राम शिळेचा संबंध भगवान विष्णूच्या 24 अवतारांशी जोडला जातो. ज्या घरात शाळिग्राम शिळा असते, त्या घरात सुख-शांती नांदते, कुटुंबीयांत एकमेकांप्रति प्रेम कायम राहतं आणि लक्ष्मीमातेची कृपाही राहते, असं मानलं जातं. या शिळांमधून श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकार आणि अन्य कलाकारांची निवड करण्यात आली आहे. ही रामाची मूर्ती पाच-साडेपाच फूट उंचीची आणि बालस्वरूप असेल. रामनवमीच्या दिवशी सूर्याची किरणं थेट राममूर्तीच्या कपाळावर पडावीत, अशा पद्धतीने मूर्तीची उंची निश्चित केली जाणार आहे.
कोण साकारणार मूर्ती?
श्रीरामाची भव्य मूर्ती करण्याच्या दृष्टीने या शाळिग्राम शिळांची अनुकूलता, तसंच त्यांचं संभाव्य क्षरण आदी बाबींवर तज्ज्ञांकडून परीक्षण आणि चर्चा केली जाणार आहे. रामाची मूर्ती साकारण्याची जबाबदारी शिल्पकार पद्मभूषण राम वनजी सुतार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं भव्य शिल्पही त्यांनीच साकारलं आहे. अलीकडेच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांना श्रद्धांजली म्हणून अयोध्येत एक वीणा स्थापन करण्यात आली. ती वीणा राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी तयार केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

श्रीरामाच्या मूर्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या शाळिग्रामचे महत्त्व माहिती आहे का?
...आता तयारी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची; दोन मोठ्या शाळीग्राम शिळा अयोध्येत पोहोचल्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm