पोटासाठी लाठी काठीचा खेळ करणाऱ्या व्हायरल आजीचा पाहा Viral Video पोटासाठी वृद्धेची 'कसरत';

पोटासाठी लाठी काठीचा खेळ करणाऱ्या व्हायरल आजीचा पाहा Viral Video पोटासाठी वृद्धेची 'कसरत';

belgavkar.com | belgaum | belgavkar

साठीनंतरचं आयुष्य हे निवृत्तीचं असतं. नातवांबरोबर मजेत वेळ घालवण्याचं हे वय असतं. दिवसभर नातवांबरोबर गमंत करणे, त्यांच्या वयाएवढं होऊन त्यांच्यासारखीच धमाल करणे, आवर्जुन वेळ काढून आपले आजवर राहिलेले छंद, हौस पूर्ण करणे असेच ज्येष्ठ नागरिकांचे चित्र साधारणतः अनेक घरांमध्ये दिसून येते. परंतु, प्रत्येकाच्या नशिबात हे भाग्य नसते. काहींना या वयातही काबाडकष्ट करावे लागतात, कुटुंबासाठी चपला झिजवाव्या लागतात. त्यातीलच एक शांता बाळू पवार नावाच्या आजी. हडपसर येथील वैदवाडी येथे राहणाऱ्या शांता पवार या 85 वर्षीय आजींना आजही आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर यावे लागत आहे. या स्वाभिमानी शांता आजी दिवसभर शहराच्या विविध भागात लाठी फिरवण्याची (दंडविद्या) आपली कला दाखवून त्यातून मिळणाऱ्या कमाईतून नातवंडाची पोटं भरतात.

कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुणाचं काम बंद, कुणाचे पगार कापले, कुणाची नोकरी गेली. कित्येकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. हातावर पोट असलेल्यांचे तर हालच होत आहेत. पोट भरण्यासाठी रस्त्यावर कसरत करणाऱ्या अशाच एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लाखो नेटकर्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
यामध्ये ही महिला लाठीकाठी खेळताना दिसते आहे. आपलं कौशल्य सादर करत ती पोट भरण्याचा प्रयत्न करत आहे. रितेश देशमुखनं या वृद्ध महिलेला वॉरिअर आजी (Warrior Aaji) असं म्हटलं आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबईतील अशा अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि अनेकांनी आपल्या गावाची वाट धरली.

शांता आजींची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. याही परिस्थिती त्या आपल्या 7 नातवडांना सांभाळतात. त्यांच्या मुलांच्या आणि मुलींची ही अपत्ये आहेत. आजींचं वयोमान जास्त आहे. या वयात त्यांनी घरी बसून विश्रांती करण्याची गरज आहे. पण आपलं आणि नातवांचं पोट भरण्यासाठी घरी बसून चालणार नाही, याची त्यांना जाणीव आहे.
या वयातही तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने लाठी-काठींचे प्रात्यक्षिक दाखवत शहरात फिरतात. लाठीकाठी फिरवताना त्यांना पाहताना प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरुन येतो. त्यांच्या या प्रात्यक्षिकानंतर लोक स्वतःहून त्यांना पैसे देतात. या मिळालेल्या थोड्याफार पैशातून त्या आपला चरितार्थ चालवतात.
आजींचा लाठीकाठी फिरवण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून आजींना मदत करणारे हातही पुढे आले आहेत. आजींना आणखी मदतीची गरज आहे. अनेकजण आजी या वयातही कष्ट करत असल्याचे पाहून त्यांचे कौतुक करत आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनीही आजींचे कौतुक करणारे टि्वट केले आहे.

आता समाजातून आणखी मदतीची गरज आहे. त्यासाठी आजींचा पत्ता आणि बँक अकाऊंटची माहिती पुढीलप्रमाणे.
शांता आजींचा पत्ता-
सर्व्हे नं- 106, गोसावी वस्ती, बौद्धविहारजवळ, वैदवाडी, हडपसर, पुणे.
आजींचा संपर्क क्र.- 9373611504
आजींच्या बँक खात्याची माहिती-
शांता बाळू पवार
बँक ऑफ महाराष्ट्र
अकाउंट नंबर : 60163754342
IFSC code : MAHB0000001
शाखा : हडपसर, पुणे

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पोटासाठी लाठी काठीचा खेळ करणाऱ्या व्हायरल आजीचा पाहा Viral Video पोटासाठी वृद्धेची 'कसरत';

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm