उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना दिली 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा; सभापती व्यंकय्या नायडू यांनी सुनावले (Watch Video)

उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना दिली 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा;
सभापती व्यंकय्या नायडू यांनी सुनावले (Watch Video)

belgavkar.com | belgaum | belgavkar

मत मागताना छत्रपती शिवाजी महाराज चालतात पण शपथ घेताना नाव घेतलं तर झोंबलं...

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या (Rajyasabha) नवनियुक्त खासदारांचा शपथविधी सोहळा उशिराने आज पार पडला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या दालनामध्ये हा सोहळा घेण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ची साथ सोडून भाजप (BJP) मध्ये प्रवेश घेतलेल्या उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी सुद्धा खासदार पदाची शपथ घेतली. उदयन राजे यांनी शपथ घेऊन झाल्यावर जय हिंद, जय भारत, जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा सुद्धा दिल्या मात्र यावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. हे राज्यसभेचं सभागृह नाही माझं दालन आहे, त्यामुळे कोणीही कोणत्याच घोषणा देऊ नयेत अशा शब्दात समज दिली.
यापूर्वी सुद्धा अनेकवेळा शपथविधी सोहळ्यात खासदारांनी अशा प्रकारे अन्य घोषणा दिल्याने वाद झाले आहेत. मागील वर्षी लोकसभा सदस्यपदाची शपथ घेताना सुद्धा काही खासदारांनी धार्मिक घोषणा दिल्या होत्या, इतकेच काय तर महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा होताना अन्य आमदारांनी घोषणा देत शपथ घेतल्याने वाद झाला होता. या एकूण पार्श्वभूमीवर व्यंकय्या नायडू यांची आजची प्रतिक्रिया आहे. हा सोहळा रेकॉर्ड होत आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी केवळ शपथच घ्यावी, घोषणा देऊ नये अशा शब्दात नायडू यांनी उदयन राजे यांना समज दिली आहे.
Siddhesh Nikam Patil @NikaSi_SiD @Chh_Udayanraje मत मागताना छत्रपती शिवाजी महाराज चालतात पण सभागृहात शपथ घेताना नाव घेतलं तर झोंबलं.... उपराष्ट्रपती वैंकया नायडू ने माफी मागितली पाहिजे #शेमऑनवैंकयानायडू

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना दिली 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा; सभापती व्यंकय्या नायडू यांनी सुनावले (Watch Video)
मत मागताना छत्रपती शिवाजी महाराज चालतात पण शपथ घेताना नाव घेतलं तर झोंबलं...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm