छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना संतापली, म्हणाली…

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना संतापली, म्हणाली…

belgavkar.com | belgaum | belgavkar

एका व्हिडिओवर कमेंट करताना कंगनाने व्यक्त केलं मत

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद शांत होण्याची चिन्ह दिसत नाहीत. जोशुआने यासंदर्भात माफी मागितल्यानंतर तिला थेट बलात्काराची धमकी देणारा व्हिडिओ शुभम मिश्रा या तरुणाने पोस्ट केला. त्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करने या तरुणाला अटक करण्याची मागणी केली. वडोदरा पोलिसांनी या तरुणाला अटक केली. आता या प्रकरणावरुन ट्विटवरही जोरदार चर्चा सुरु आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियन्सवर कारवाई करण्यात यावी असं अनेकांचं म्हणणं असून यामध्ये आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचीही भर पडली आहे. कंगनानेही अशाच प्रकारची मागणी केली आहे.
कंगना रणौतचे म्हणणे ऑनलाइन माध्यमावर मांडणाऱ्या टीम कंगना रणौत या ट्विटर हॅण्डलवरुन एका कॉमेडियनने या सर्व प्रकरणावर पोस्ट केलेल्या उपहासात्मक व्हिडिओवर कमेंट करण्यात आली आहे. या उपहासात्मक व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा संदर्भ देत सध्याच्या कॉमेडियन्सवर भाष्य करण्यात आलं आहे. यामध्ये कंगणाने
'ज्यांना दोन पैशाचीही किंमत नाहीय, ज्यांना कोणी विचारत नाही असे लोकं शहीदांची मस्करी करतात. हे योग्य नाही. कोणीही शहीदांची मस्करी करु नये. आपले राष्ट्रीय हिरो आणि थोर व्यक्तींची मस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदे हवेत,'
असं मत व्यक्त केलं आहे.
कंगनाने लगावलेला हा टोला अप्रत्यक्षपणे अभिनेत्री स्वरा भास्करसाठी असल्याचे बोलले जात आहे. ज्या व्हिडिओवर कंगनाने कमेंट केली आहे त्यामध्ये स्वरा भास्करला माझा विनोद आवडला होता असं म्हटलं आहे. स्वरा भास्करने पुढाकार घेतल्यामुळेच शुभम मिश्राचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यावर कारवाई झाल्याने नेटकऱ्यांनी स्वराचेही अभिनंदन केलं आहे.
Jab do kaudi ke lukke gawaar good for nothing types martyrs ka mazak udaakar attention seek karte hain, it’s not ok, nobody should be allowed to mock martyrs, there should be strict laws against making fun of majoritarian faith and our national heroes. https://t.co/U6CHK03PPS
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) July 14, 2020

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना संतापली, म्हणाली…
एका व्हिडिओवर कमेंट करताना कंगनाने व्यक्त केलं मत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm