साहेब फाउंडेशन आणि युवा समितीचा संयुक्त उपक्रम - डेंग्यू प्रतिबंधक औषध मोहीम

साहेब फाउंडेशन आणि युवा समितीचा संयुक्त उपक्रम - डेंग्यू प्रतिबंधक औषध मोहीम

belgavkar.com | belgaum | belgavkar

शहापूर बै. नाथ पै चौकाजवळील चांभारवाडा परिसरात डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याची दखल घेत साहेब फाउंडेशन आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती च्या वतीने आज गुरुवारी शहापूर भारत नगर परिसरातील नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक औषध देण्यात आले.
साहेब फौंडेशनच्या संस्थापिका उज्वला संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेताजी सुभाष चंद्र सांस्कृतिक भवन संभाजी पाटील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात शहापूर नाथ पै सर्कल चांभारवाडा, नवी गल्ली, भारत नगर, खासबाग गौलर छावणी या भागातील 600 हून अधिक नागरिकांनी डेंग्यू प्रतिबंधक औषधाचा लाभ घेतला.
यावेळी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उद्योजक एस. के.पोटे, महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षक कलावती बजंत्री, भारतनगर येथील पंच परशराम बामणे, नंदकुमार शिंदे, सामाजिक कार्यकर्ते महादेव पाटील, किरण हुद्दार, सचिन केळवेकर, पत्रकार श्रीकांत काकतीकर, मिलिंद देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण, प्रभाकर अष्टेकर, परशुराम कांबळे, जोनसन आदींनी विशेष परिश्रम घेतले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

साहेब फाउंडेशन आणि युवा समितीचा संयुक्त उपक्रम - डेंग्यू प्रतिबंधक औषध मोहीम

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm