बेळगाव : आमदारांच्या गाडीचा नंबर '2023'

बेळगाव : आमदारांच्या गाडीचा नंबर '2023'

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या नव्या वाहनाचा शुभारंभ स्मशानभूमीतून केला आहे. समाजामध्ये अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी आपण हा उपक्रम राबवित आहोत, अशी माहिती आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिली. विशेष म्हणजे, आमदारांनी त्यांच्या वाहनाचा क्रमांक 2023 असा ठेवला असून त्यामुळे येणाऱ्या 2023 मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात यावे अशी आपली इच्छा असल्याचे मनोगत यांनी व्यक्त केले.
जीवनातून अंधश्रद्धेला फाटा देऊन सर्वांनी कृतिशील व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. KA 49 N 2023 या नंबर प्लेटच्या नव्या कारगाडीचे विधिवत पूजन त्यांनी स्मशानभूमीत केले. अंधश्रद्धा निर्मूलना बरोबरच येणार्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्याचे त्यांचे ध्येय आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आमदारांच्या गाडीचा नंबर '2023'

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm