बेळगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम; नियोजित हॉकी मैदानाची प्रत्यक्ष पाहणी

बेळगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम;
नियोजित हॉकी मैदानाची प्रत्यक्ष पाहणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : नियोजित अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानासाठी बुडाने रामतीर्थ नगर येथे मंजुर केलेल्या 8 एकर जागेची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. बेळगाव हॉकी संघटनेतर्फे जागेची पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त केले. हॉकी बेळगाव व बुडाच्या मागणीनुसार शासनाने बेळगावात आंतरराष्ट्रीय अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमला मंजुरी दिली आहे. त्यामुळे, शहरातील हॉकीला गतवैभव प्राप्त होणार आहे. या मंजुरीमुळे हॉकीपटूंतही चैतन्य निर्माण झाले आहे. रामतीर्थनगरमधील 8 एकर जागेत 15 कोटी रुपये खर्चुन अत्याधुनिक अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमची उभारणी केली जाणार आहे. अशा प्रकारचे हे राज्यातील तिसरे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम होणार आहे. त्याचा लाभ शहरातील हॉकीपटूंना होईल.
बेळगावला हॉकीचा मोठा इतिहास आहे. बंडू पाटील, शंकर लक्ष्मण, शांताराम जाधव व धनंजय महाडिक यांनी 1960, 1965, 1970 च्या ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
यावेळी बुडा चेअरमन व हॉकी बेळगावचे अध्यक्ष घुळाप्पा होसमनी, आयुक्त प्रितम नसलापुरे, असिस्टंट इंजिनिअर एम. व्ही. हिरेमठ, सेक्रेटरी सुधाकर चाळके, उपाध्यक्ष पूजा जाधव, प्रकाश कालकुंद्रीकर, एस.के. पोटे, मनोहर पाटील, नामदेव सावंत, माजी उपमहापौर संजय शिंदे, श्रीकांत आजगावकर, नीशा सामंत, उत्तम शिंदे, प्रशांत मंकाळे, विकास कलघटगी, महेश होसूरकर आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी हाँकी मैदानाविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम; नियोजित हॉकी मैदानाची प्रत्यक्ष पाहणी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm