रविवारचा लॉकडाऊन व माजी विद्यार्थ्यांचं शाळेवरच प्रेम; 9 टन इतकी फरशी डोकीवरून डोंगर माथ्यावर नेली

रविवारचा लॉकडाऊन व माजी विद्यार्थ्यांचं शाळेवरच प्रेम;
9 टन इतकी फरशी डोकीवरून डोंगर माथ्यावर नेली

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : माजी विद्यार्थ्यांचं प्रेम ही शाळेची मोठी संपदा असते. गेल्या वर्षीच्या मुसळधार पावसामुळे जांबोटी (विश्व भारत समितीचे माध्यमिक विद्यालय, जांबोटी, खानापूर तालुका) माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले. याप्रसंगी कृतीशील माजी विद्यार्थ्यांचे पाठबळ लाभले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यातून संपूर्ण इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात काम असताना पावसामुळे विद्यालयाच्या नियोजित इमारती कडे जाणारा रस्ता बंध झाला. मग बांधकाम साहित्य वाहूननेणे मुस्कील झाले, इमारती साठी लागणारी फारशी दूरवर खाली करण्यात आली. ही समस्या लक्षात घेऊन माजी विद्यार्थ्यांनी ही फरशी उंच डोंगर माथी असलेल्या इमारती कडे श्रमदानाने पोचविली आणि रविवारचा लॉकडाऊन सत्कारणी लावला.

ओंकार कोटीभास्कर, आदित्य जांबोटकर, मयूर किनारी, शुभम रत्नाकर देसाई, प्रशांत हणमंत देसाई, प्रमोद महेंद्र देसाई, विजय हवालदार, गुरुदास घवरे, नरेश गावस, श्रीनाथ सडेकर, तानाची घवरे, तुकाराम सडेकर, महेश साबळे, दिनकर पाटील, सिध्दरुद्ध पाटील,पास्कल दलमेत आदी अनेक माजी विद्यार्थ्यांनी सुमारे 9 टन इतकी फरशी डोकीवरून वाहून नेली. या सगळ्यात कुणी IT इंजिनियर, कुणी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, तर कोण शासकीय सेवेत पण सगळं विसरून आपल्या शाळेसाठी श्रमदान करताना कृतज्ञतेच्या भावनेने कार्य करताना दिसले. बंधुनो सलाम तुमच्या कृतज्ञतेला

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

रविवारचा लॉकडाऊन व माजी विद्यार्थ्यांचं शाळेवरच प्रेम; 9 टन इतकी फरशी डोकीवरून डोंगर माथ्यावर नेली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm