बेळगाव जिल्ह्यातील आत्महत्या रोखण्यासाठी 'Help For Needy' चा पुढाकार

बेळगाव जिल्ह्यातील आत्महत्या रोखण्यासाठी 'Help For Needy' चा पुढाकार

belgavkar.com | belgaum | belgavkar

8618993767 या क्रमांकावर संपर्क करावा

बेळगाव शहर व जिल्ह्यामध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या आत्महत्या ही चिंताजनक बाब असून त्या रोखण्यासाठी 'Help For Needy' या संघटनेने विशेष असा आगळा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत काही आत्महत्या रोखण्यामध्ये सदर संघटना यशस्वी झाल्याची माहिती संघटनेचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी दिली. शहरातील जत्तीमठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'हेल्प फोर नीडी' ही संघटना समाजातील वंचित गरजू आणि गरीब घटकांसाठी कार्य करते. गेल्या तीन वर्षापासून सदर संघटना सिव्हिल हॉस्पिटलमधील गरजूंना विनामूल्य भोजन देत आहे. याशिवाय ज्यांचे शिक्षण अडले आहे, ज्यांच्या शस्त्रक्रिया आर्थिक परिस्थितीमुळे थांबल्या आहेत, अशा सर्वांना सदर संघटना मदत करत असते.
सध्याच्या काळात वाढलेल्या आत्महत्या लक्षात घेत सदर संघटनेने याबाबत कृतिशील पाऊल उचलले आणि या आत्महत्या रोखण्यासाठी समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती अनगोळकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. माध्यमांमध्ये सतत आत्महत्येच्या बातम्या येत असतात. त्यामुळे आपण आत्महत्या करणाऱ्यांबाबत अस्वस्थ झालो आणि त्यासाठी हा उपक्रम हाती घेतला.
एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे वागणे अचानक बदलते, ती एकटी एकटी राहू इच्छिते, अचानक संवाद बंद करते किंवा अशा व्यक्तींच्या नेहमीच्या वागण्यामध्ये काही बदल आढळले तर कुटुंबीयांनी त्या व्यक्तीवर विशेष लक्ष ठेवावे आणि आपल्याला 8618993767 या क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन सुरेंद्र अनगोळकर यांनी शेवटी केले. पत्रकार परिषदेस योगेश कलघटगी, विश्वजीत हसबे आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यातील आत्महत्या रोखण्यासाठी 'Help For Needy' चा पुढाकार
8618993767 या क्रमांकावर संपर्क करावा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm