Smart City - बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे फोटोज पाहण्यासाठी क्लिक करा - बसस्थानकात खड्डेच खड्डे

Smart City - बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे फोटोज पाहण्यासाठी क्लिक करा - बसस्थानकात खड्डेच खड्डे

belgavkar.com | belgaum | belgavkar

गेली अनेक वर्षे अनेक समस्यांसह अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलेले बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक यंदाच्या पावसाळ्यातही त्याच समस्यांनी घेरले गेले आहे. भव्य आवार लाभलेल्या या बस स्थानकात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे डबके साचले आहेत. बस स्थानकात जागोजागी मोठे खड्डेच खड्डे पडले आहेत. बस जेव्हा स्थानकात प्रवेश करते तेव्हा प्रवाशांना खूप मोठ्या धक्यांचा सामना करावा लागतो.
उतरण्याच्या तयारीत असलेले प्रवाशी या अनपेक्षीत धक्क्यांमुळे एकमेकांच्या अंगावरही जावून पडतात व एकमेकांना कोरोनाचा खो देतात. चालकांना देखील या स्थानकातून बस चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. यंदाच्या पावसाळ्यात अद्यापपर्यंत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. जो काही पाऊस झाला आहे तो अगदी असमाधानकारक.
अशातही बस स्थानकात झालेल्या पावसाच्या पाण्यात डबके साचले आहे. येत्या काळात अधिक पाऊस झाला तर बसस्थानकात बसची चाके खड्ड्यांतच रुतून बसतील, इतकी वाईट अवस्था सध्या आहे. परिवहन महामंडळ व जनेतेचे सेवक (आमदार-खासदार-पालकमंञी) याकडे कधी लक्ष देणार, असा सवाल प्रवाशी उपस्थित करीत आहेत.
Central Bus Station Belgaum - CBS Belgaum

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Smart City - बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे फोटोज पाहण्यासाठी क्लिक करा - बसस्थानकात खड्डेच खड्डे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm